SIP Mutual Funds Investment: अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं महत्व वाढत आहे. कारण भविष्यातील येणाऱ्या अडणींचा सामना करण्यासाठी आत्तापासून योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणं गरजेचं आहे. सध्या गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहे. बऱ्याचदा पैशांची गुंतवणूक कोठे करावी? असी स्थिती निर्माण होते. दरम्यान, SIP ही म्युच्युअल फंड गुंतवणुकीची अतिशय चांगली आणि सोपी पद्धत आहे. यामध्ये दर महिन्याला तुमच्या खात्यातून ठराविक रक्कम डेबिट केली जाते. 


गुंतवणूकदारांना एसआयपीमध्ये कमी जोखमीसह चांगला परतावा मिळतो. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मासिक पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIPs) ने डिसेंबरमध्ये प्रथमच 26,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. हे म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये लहान गुंतवणूकदारांचे वाढते स्वारस्य दर्शवते. डिसेंबर 2024 मध्ये SIP मध्ये गुंतवणूकदारांचे योगदान 26,459 कोटी रुपये होते, जे नोव्हेंबर 2024 मध्ये 25,320 कोटी रुपये होते. याशिवाय म्युच्युअल फंड (एमएफ) फोलिओ डिसेंबरमध्ये वाढून 22.50 कोटी झाले, जे मागील महिन्यात 22.02 कोटी होते.


1 कोटी रुपयांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती वेळ लागणार?


दरम्यान, 1000 रुपये, 2,000 रुपये, 3000 रुपये आणि 5000 रुपयांच्या मासिक SIP योगदानासह 1 कोटी रुपयांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल याबाबातची माहिती आज आपण पाहणार आहोत. ही गणना 12 टक्के वार्षिक परतावा आणि दरवर्षी SIP रकमेत 10 टक्के वाढ यावर आधारित करण्यात येत आहे. 


दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक केल्या किती वर्षात करोडपती व्हाल? 


जर तुम्ही दरवर्षी 10 टक्के स्टेप-अपसह दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक केली आणि दरवर्षी 12 टक्क्यांपर्यंत परताव्याची अपेक्षा केली, तर तुम्ही 31 वर्षांत सुमारे 1.02 कोटी रुपये जमा करु शकता. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही 1000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 31 वर्षात तुम्ही करोडपती होऊ शकता. 


मासिक 2000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती वर्षात करोडपती व्हाल?


वर्षिक 10 टक्के स्टेप-अपसह मासिक 2000 रुपयांच्या SIP मध्ये तुम्ही दरवर्षी 12 रिटर्नसह 27 वर्षांमध्ये तुम्ही 1.15 कोटी जमा कराल.


दरमहा 3000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती वर्षात करोडपती व्हाल?


वार्षिक 10 टक्के दराने वाढणारी दरमहा 3000 रुपयांची SIP 24 वर्षात 12 टक्के वार्षिक परताव्यात 1.10 कोटी होईल. या मुदतीत तुमची गुंतवणूक केलेली एकूण रक्कम  31.86 लाख असेल आणि परतावा  78.61 लाख असणार आहे. 


5000 रुपयांची SIP केल्यास किती वर्षात करोडपती व्हाल? 


जर तुम्ही SIP अंतर्गत दरमहा 5000 पर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला 24 वर्षात 1.10 कोटी रुपये वार्षिक 10 टक्के दराने वाढणाऱ्या 12 टक्के वार्षिक परताव्यासह मिळतील. या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक 31.86 लाख रुपये असेल आणि परतावा 78.61 लाख रुपये असणार आहे.