SIP Calculator : प्रत्येकजण लक्षाधीश होण्याचं स्वप्न पाहतो, परंतु काही मोजकेच ते साध्य करू शकतात. तुम्हीही मध्यमवर्गीय कुटुंबातील असाल, नोकरी करत असाल आणि भविष्यात तुम्हाला कोट्यधीश बनायचं असेल तर हे स्वप्न SIP च्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एसआयपीद्वारे (SIP Calculator Updates) करावी लागते. SIP हे मार्केट लिंक्ड असलं तरी, बहुतेक तज्ज्ञ हे आजच्या काळात गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय असल्याचं सांगतात. 


तुम्ही SIP मध्ये जितकं जास्त कालावधीसाठी गुंतवणूक कराल, तितका चांगला परतावा तुम्हाला मिळेल. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा (Compound Interest) लाभ मिळतो. अशा परिस्थितीत, तुम्ही गुंतवलेल्या रकमेत दीर्घकाळात वेगानं वाढ होते. SIP चा सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. हा परतावा आजच्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही योजनांपेक्षा किंवा फिक्स डिपॉझिटहून कित्येक पटींनी जास्त आहे. अशातच, दीर्घकाळासाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही स्वत:ला कोट्याधीश नक्कीच बनवू शकता. 


5000 रुपयांची गुंतवणूक करुन कोट्यधीश होण्यासाठी किती वर्ष लागतील? 


जर तुम्ही गुंतवणुकीची रक्कम थोडी वाढवली आणि ती 8000 रुपये दरमहा गुंतवली, तर कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला किमान 22 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. 22 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 21,12,000 रुपये होईल, परंतु, या गुंतवणुकीवर 12 टक्के रिटर्ननुसार तुम्हाला 1,03,67,167 रुपये मिळतील. 


10,000 रुपये महिन्याला गुंतवून तुमचं स्वप्न कधी पूर्ण होईल? 


जर तुमचं मासिक वेतन चांगलं असेल आणि तुमच्या सगळा खर्च वगळता महिन्याला दहा हजार रुपये एसआयपीमध्ये गुंतवणं शक्य असेल, तर तुमचं कोट्यधीश होण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं. अशा परिस्थितीत तुम्हाला 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही 20 वर्षांत 24,00,000 रुपयांची गुंतवणूक केली, तर त्यावर तुम्हाला 12 टक्के रिटर्न मिळाला, तर तब्बल 99,91,479 रुपये (सुमारे 1 कोटी रुपये) मिळतील. जर तुम्ही हीच एसआयपी 21 वर्ष चालू ठेवली तर तुम्हाला रिटर्न म्हणून 1,13,86,742 रुपये मिळू शकतात.


SIP कशी ठरते फायदेशीर? 


SIP बाबतची उत्तम गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमची गुंतवणूक कधीही वाढवू किंवा कमी करू शकता. अर्थतज्ज्ञ सांगतात की, चांगल्या रिटर्नसाठी प्रत्येकानं दरवर्षी थोडी रक्कम वाढवून गुंतवणूक केली पाहिजे. फक्त 500 रुपये वाढवले ​​तरी मिळणारा रिटर्न नक्कीच जास्त असतो. हे इतकं अवघड नाही कारण तुमचं उत्पन्नही वेळेनुसार वाढत असतं. थोडीफार काटकसर आणि नियोजनानं हे सहज शक्य आहे. या व्यतिरिक्त, SIP मध्ये सरासरी परतावा 12 टक्के आहे, परंतु जर तुम्हाला यापेक्षा जास्त परतावा मिळाला, तर तुमचे पैसे आणखी कमी वेळेत वाढतील. तसेच, गरज भासल्यास किंवा तशी परिस्थिती उद्भवल्यास तुम्ही SIP मिडवे म्हणजे, मध्येच थांबवू देखील शकता आणि वेळेनुसार तिथूनच पुन्हा सुरू करू शकता.


(टीप : म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही यासंबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. वरली दिलेली माहिती केवळ माहिती म्हणून पुरवत असून एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)