Silver Rate Hike : अलिकडच्या काळात सोन्या चांदीच्या दरात (Silver Price) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको असा प्रश्न पडत आहे. दरम्यान, ब्रोकरेज हाऊसच्या अहवालानुसार, अलीकडच्या काही महिन्यांत चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. लवकरच चांदीची किंमत 1.25 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे.  


लवकरच चांदीची किंमत 1.25 लाख रुपयांवर जाणार 


येत्या काही दिवसांत चांदीच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. लवकरच चांदीची किंमत 1 लाख रुपयांच्या पुढे जाऊन 1.25 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या अहवालात चांदीच्या किमतींबाबत मोठा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज हाऊसने आपल्या अहवालात गुंतवणूकदारांना भावात घसरण झाल्यास चांदी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.


चांदी 1.25 लाखांवर जाणार


मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने चांदीबाबतचा त्रैमासिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना घट झाल्यावर चांदी खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ब्रोकरेज हाऊसच्या रिसर्च नोटनुसार, अलीकडच्या काही महिन्यांत चांदीच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चांदीची कोणतीही घसरण ही खरेदीची संधी म्हणून वापरली पाहिजे. ब्रोकरेज हाऊसने सांगितले की 86,000 - 86,500 रुपये ही चांदीची प्रमुख आधार पातळी आहे.


दिवसेंदिवस सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ, सर्वसामान्यांना फटका


दिवसेंदिवस सोन्यासह चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या वाढत्या दरामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ लागत आहे. त्यामुळं सामान्य लोकांना सोनं चांदी घेणं परवडत नाही. दरम्यान, सोनं आणि चांदी हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळं मोठ मोठ्या मोठ्या बँका, संस्था या मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. दरम्यान, लग्नसराईच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. या काळात खेरदीदारंना मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले होते. तर अनेक ठिकाणी ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीकडं पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं होते. त्यानंतर काही काळ सोन्या चांदीचे दर स्थिर राहिले होते. मात्र, आता पुन्हा सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळच आहे. त्यामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको असा प्रश्न पडत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Gold Silver Rate: महिन्याभराच्या विश्रांतीनंतर सोन्याच्या दाराला पुन्हा झळाळी! जाणून घ्या आजचे सोन्याचे दर