Shriram Properties IPO: रिअल इस्टेट कंपनी श्रीराम प्रॉपर्टीजचा आयपीओ आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. चांगल्या परताव्याची अपेक्षा असलेल्या गुंतवणुकदारांची मोठी निराशा झाली आहे. श्रीराम प्रॉपर्टीजचा शेअर 94 रुपयांवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. गुंतवणुकदारांनी या शेअरच्या आयपीओसाठी  8 ते 10 डिसेंबर दरम्यान आयपीओसाठी अर्ज केले होते. कंपनीने आयपीओमध्ये 118 रुपयांना शेअर निश्चित केले होते. 

श्रीराम प्रॉपर्टीज ही कंपनी रिअल इस्टेटमधील नावाजलेली कंपनी आहे. दक्षिण भारतातील रिअल इस्टेट बाजारात या कंपनीचा बोलबाला आहे. मागील काही दिवसात शेअर बाजारात सूचीबद्ध झालेले आयपीओंकडून चांगला परतावा मिळाला होता. श्रीराम प्रॉपर्टीजकडून अनेक गुंतवणुकदारांना मोठी अपेक्षा होती. 


श्रीराम प्रॉपर्टीजचा 600 कोटींचा आयपीओ आठ डिसेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला होता. कंपनीने आपल्या शेअरसाठी 113 ते 118 रुपये निश्चित केले होते. आयपीओला 4.60 पटीने ओव्हर-सब्सक्रिप्शन मिळाले होते. श्रीराम प्रॉपर्टीज याआधी विक्रीसाठी 550 कोटी रुपयांचे शेअर सादर करणार होती. मात्र, त्यात घट करून 350 कोटी रुपये केले. याप्रकारे आयपीओचा आकारदेखील 800 कोटींहून 600 कोटी झाला.  


कर्मचाऱ्यांना मिळाला डिस्काउंट


या आयपीओनुसार, 250 कोटींच्या मूल्यांच्या नव्या शेअरच्या विक्रीसाठी 350 कोटींच्या जुन्या शेअरचाही समावेश होता. कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी तीन कोटींच्या मूल्याचे शेअर आरक्षित होते. 


अँकर गुंतवणुकदारांकडून निधी जमवला


श्रीराम प्रॉपर्टीजने आपल्या आयपीओ आधी अँकर गुंतवणुकदारांकडून 268 कोटी रुपये जमवले आहेत. बीएनपी परिबा आर्बिट्रेज, सोसायटी जनरल, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी, सुंदरम म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ एमएफ आणि एचडीएफसी एमएफ यांनी अँकर गुंतवणूकदार म्हणून कंपनीचे शेअर्स विकत घेतले.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या: