मुंबई : शेअर बाजार (Share Market) प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी बंद असतो. या आठवड्यात शनिवारी म्हणजेच 18 मे रोजी बीएसई आणि एनएसई असे दोन्ही शेअर बाजार खुले राहणार आहेत. या दिवशी स्पेशल ट्रेडिंग सेशनदेखील असेल. एखाद्या कठीण परिस्थितीतील तयारीच्या चाचणीसाठी शेअर बाजार शनिवारीदेखील चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारच्या स्पेशल ट्रेडिंग सेशनमध्ये (Special Trading Session) गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची चांगली संधी आहे.
या कारणामुळे घेतला निर्णय
शेअर बाजारात अचानकपणे काही अडचण आल्यास किंवा नेटवर्कची अडचणी निर्माण झाल्या बाजारावर कमीत कमी परिणाम कसा पडेल तसेच ट्रेडर्सना कमीत कमी त्रास कसा होईल हे तपासण्यासाठी शनिवारी शेअर बाजार चालू ठेवण्याचा निर्णय बीएसई आणि एनएसईने घेतला आहे. मार्च महिन्यातदेखील अशाच प्रकारची तपासणी करण्यात आली होती.
या सेगमेंटमध्ये होणार स्पेशल ट्रेडिंग
शनिवारी बीएसई आणि एनएसईने स्टॉक्स ट्रेडिंगसह फ्यूचर अँड ऑप्शन्स या कॅटेगिरीतही स्पेशल ट्रेडिंग सेशन्स आोयजित केले आहे. या काळात ट्रेडिंगला बीएसई आणि एनएसईच्या प्रमुख संकेतस्थळावरून रिकव्हरी साईटवर ट्रान्सफर केले जाणार आहे. ही प्रक्रिया करताना ट्रेडिंगला रोखले जाणार नाही.
ट्रेडिंगचा वेळ काय असेल?
शनिवारी बीएसई आणि एनएसईवर ट्रेडिंगचे दोन सेशन्स असतील. यातील पहिले सेशन हे प्रायमरी साईटवर सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपासून 10 वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर ट्रेडिगंला रिकव्हरी साईटवर ट्रान्सफर केले जाईल. या रिकव्हरी साईटवर सकाळी 11 वाजून 30 मिनटांपासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत दुसरे ट्रेडिंग सेशन आयोजित केले जाणार आहे.
हेही वाचा :
शेअर मार्केटमध्ये आला नवा स्कॅम, 'पिग बुचरिंगचे' शिकार झाल्यास होणार बँक खाते रिकामे!
मोदींनी 9 लाख गुंतवले, आता मिळणार 13 लाख रुपये, पोस्टाची 'ती' योजना आहे तरी काय?
पगार 10 लाख रुपये असला तरी शून्य कर, कसं शक्य आहे? जाणून घ्या नेमका फंडा काय?
SIP करताना 'ही' एक काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान झालंच म्हणून समजा!