Share Market Opening : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सावध सुरुवात झाली असल्याचे चित्र आहे. सेन्सेक्स 73 अंकानी वधारत सुरू झाला. निफ्टीतही 26 अंकानी वधारत 16241 अंकावर सुरू झाला.
आज व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्समध्ये काहीशी तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये 109 अंकानी वधारून 54397 अंकावर व्यवहार करत आहे. तर, निफ्टीदेखील 35 अंकाने वधारत 16248 वर व्यवहार करत आहे. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक खरेदीचे संकेत देत होते. त्यानंतर मात्र, पुन्हा घसरण सुरू झाली.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 20 शेअर्स वधारले आहेत. तर, 10 शेअरमध्ये घसरण झाली आहे. निफ्टी 50 मधील 32 शेअरमध्ये तेजी दिसत आहे. तर, 18 शेअरमध्ये घसरण सुरू आहे. शेअर बाजारात बँकिंग, ऑटो, मेटल्स, एनर्जी क्षेत्रातील शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे
हिंदुस्थान युनिलिव्हर 2.55 टक्के, भारती एअरटेलमध्ये 0.53 टक्के, आयटीसीमध्ये 0.447 टक्के, टीसीएसमध्ये 0.39 टक्के, इन्फोसिच्या शेअरमध्ये 0.34 टक्क्यांची घसरण झाली आहे.
मेटल कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. झोमॅटो कंपनीचे तिमाही निकाल चांगले आल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आज दिसून आला. मागील सत्रांपासून पडझड पाहिलेल्या झोमॅटोच्या शेअर दरात तेजी दिसून आली आहे.
त्याशिवाय, टाटा स्टील, टाटा मोटर्स, ओएनजीसी, अदानी पोर्ट, सन फार्मासारख्या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी असल्याचे चित्र आहे.
सोमवारी, शेअर बाजारात काहीशी अस्थिरता दिसून आली. शेअर बाजाराची सुरुवात झाली त्यावेळी सेन्सेक्स वधारला, पण बाजार बंद होताना त्यामध्ये पुन्हा घसरण झाली. सोमवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 37 अंकानी, तर निफ्टीही 51 अंकानी घसरला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: