PNB Bank : सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) मध्ये ग्राहकांकडून ATM व्यवहार शुल्कातून 645 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. बँकेने एका आरटीआयमध्ये दिलेल्या उत्तरात याची माहिती दिली आहे. पीएनबीने किमान बचत रक्कम न ठेवल्याच्या शुल्कातूनही  (Minimumm Balance Maintainance) कमाई केली आहे.    


मध्य प्रदेशमधील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी सांगितले की, देशातील दुसरी मोठी सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडे त्यांनी माहिती मागितली होती. बँकेने RTI च्या उत्तरात सांगितले की, वर्ष 2021-22 मध्ये एटीएमद्वारे व्यवहार केल्याच्या शुल्कातून 645.67 कोटींची कमाई केली आहे. बँकेच्या बचत खात्यात मासिक आणि तिमाहीत किमान रक्कम न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून  आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये (FY22) 239.09  कोटी रुपयांची कमाई केली आहे.


याआधी पीएनबीने बचत खात्यात किमान रक्कम न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून 2020-21 मध्ये 170 कोटी वसूल केले होते. पीएनबीने सांगितले की,  2021-22 मध्ये किमान रक्कम न ठेवल्यामुळे 85,18,953 खातेदारकांकडून हे शुल्क वसूल करण्यात आले. तर, बँकेकडे झिरो बॅलन्स असलेल्या खात्यांची संख्या 6,76,37,918  इतकी आहे. 



पीएनबीमध्ये 'झिरो बॅलन्स' खात्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2018-19 आर्थिक वर्ष संपेपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2019 पर्यंत PNB मध्ये अशा खात्यांची संख्या 2,82,03,379 होती. एका वर्षानंतर म्हणजे 31 मार्च 2020 पर्यंत त्यांची संख्या 3,05,83,184 पर्यंत वाढली. एका वर्षानंतर, त्यांची संख्या आणखी वाढली आणि 31 मार्च 2021 पर्यंत हा आकडा 5,94,96,731 वर पोहोचला.


इतर महत्त्वाच्या बातम्या: