Share Market : मागील आठवड्यात पडझड झालेला शेअर बाजार (Share Market) आज आठवड्यातील पहिल्याच दिवशी वधारला. गुंतवणूकदारांनी आज सकाळपासूनच खरेदीचा सपाटा लावल्याने बाजारात तेजी दिसून आली. बँकिंग आणि इतर मोठ्या कंपन्यांचे शेअर दर वधारल्याने बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी 50 (Nifty) हे दोन्ही निर्देशांक आज दीड टक्क्यांहून अधिक तेजीसह बंद झाले.
आजच्या तेजीने आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज 6 लाख कोटी रुपयांनी वाढ झाली. आज निफ्टी निर्देशांकातील 40 आणि सेन्सेक्सवरील 25 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 1241 अंकांच्या उसळीसह 71,942 अंकांवर, तर निफ्टी निर्देशांक 387 अंकांच्या तेजीसह 21,740 अंकांवर स्थिरावला.
इंडेक्स | किती अंकांवर बंद | दिवसभरातील उच्चांक | दिवसभरातील नीचांक | किती टक्के बदल? |
BSE Sensex | 71,941.57 | 72,010.22 | 70,880.54 | 1.76% |
BSE SmallCap | 44,819.28 | 44,875.69 | 44,620.07 | 0.01 |
India VIX | 15.68 | 15.85 | 13.80 | 13.09% |
NIFTY Midcap 100 | 47,979.05 | 48,003.15 | 47,289.80 | 1.63% |
NIFTY Smallcap 100 | 15,638.55 | 15,654.60 | 15,497.00 | 0.01 |
NIfty smallcap 50 | 7,241.15 | 7,252.80 | 7,185.95 | 0.01 |
Nifty 100 | 22,041.60 | 22,066.75 | 21,744.20 | 1.73% |
Nifty 200 | 11,925.90 | 11,937.75 | 11,767.65 | 1.72% |
Nifty 50 | 21,737.60 | 21,763.25 | 21,429.60 | 1.80% |
शेअर बाजार का वधारला?
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची बुधवारी बैठक आहे.अमेरिकेतील महागाई दरांच्या आकड्यांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकादारांमध्ये आज सकारात्मक वातावरण दिसून आले. त्याशिवाय, या आठवड्यात अंतरीम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने बाजाराला अपेक्षा आहेत. त्याच्या परिणामीदेखील गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर लावला असल्याचे म्हटले जात आहे.
आज, आशियाई बाजारात देखील तेजी दिसून आली. त्याचे चांगले परिणाम भारतीय भांडवली बाजारावर झाले. भारतीय अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात 7 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचा परिणामही शेअर बाजारावर झाला. रिलायन्स, ओएनजीसी, अदानी एन्टरप्रायजेझ, पंजाब सिंध बॅंक, इंडियन ओव्हरसिज बॅंकेच्या समभागात मोठी उसळी दिसून आली.
बँकिंग, ऑटो, फार्मा, धातू, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्यसेवा आणि ऑईल अॅण्ड गॅस क्षेत्रातील शेअर्स मोठ्या तेजीसह बंद झाले. फक्त एफएमसीजी सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागही वधारले.
रिलायन्सचा दबदबा, फक्त 5 तासात सव्वा लाख कोटींची कमाई
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries Limited) शेअरच्या किंमतीमध्ये विक्रमी उच्चांक सुरुच आहे. आज (29 जानेवारी) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरच्या किंमतींनी उच्चांक गाठला. एका बाजूने शेअर किंमती वाढत असतानाच कंपनीचे (Reliance Industries) मार्केट कॅप सुद्धा 19.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. रिलायन्सच्या शेअर्सनी बीएसईवर 7 टक्क्यांच्या वाढीसह 2897.40 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. बीएसईवर, रिलायन्सच्या शेअरची किंमत 6.90 टक्क्यांनी वाढून 2897.40 या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. दुसरीकडे, निफ्टी 50 इंडेक्सवर RIL स्टॉक टॉप गेनर राहिला.