Shar Market Updates: मंगळवारी शेअर बाजारात दिसून आलेली तेजी आजही कायम राहिल्याचे चित्र आहे. बँकिंग, आयटी, मेटल, एफएमसीजी, रिटेल शेअरमधील स्टॉक्सचे शेअर दर वधारले आहेत. शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच बाजार वधारला.
शेअर बाजार सुरू झाल्यानंतर निफ्टीमध्ये 58.90 अंकाची तेजी दिसून आली. निफ्टी निर्देशांक 16318 अंकावर सुरू झाला. तर, सेन्सेकमध्ये 236 अंकांची तेजी दिसून आली. सेन्सेक्स 54554 अंकावर खुला झाला.
मेटल आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. त्याशिवाय इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात तेजी दिसून येत आहे. फार्मा क्षेत्रात 1.16 टक्के आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअर दरात 0.87 टक्क्यांची उसळण दिसून येत आहे.
आज निफ्टीत भारती एअरटेलचा शेअर दर सर्वाधिक वधारला आहे. भारती एअरटेलच्या तिमाही निकालाच्या परिणामी हा आज शेअर दर वधारला असल्याचे संकेत आहेत. सन फार्मामध्ये 1.52 टक्के आणि आयशर मोटर्समध्ये 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. सिप्लामध्ये 1.42 टक्के आणि बजाज फायानान्स 1.38 टक्क्यांनी वधारला आहे.
जेएसडब्लू स्टीलच्या दरात 1.07 टक्के आणि पॉवर ग्रीडमध्ये 1.05 टक्क्यांची घसरण झाली आहे. एनटीपीसीमध्ये 0.93 टक्के आणि कोल इंडियामध्ये 0.62 टक्क्यांनी घसरण झाली आहे. टाटा स्टीलच्या दरातही 0.61 टक्क्यांनी घसरण झाली.
निफ्टी 50 मधील 37 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 13 शेअरमध्ये घसरण झाली आहे. बँक निफ्टीत 215 अंक म्हणजे 0.66 टक्क्यांनी वधारत 34517 अंकावर व्यवहार करत आहे.
दरम्यान, बुधवारी जागतिक बाजारातील खरेदीमुळे अनेक दिवसानंतर देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 1300 अंकांनी वधारत 54 हजार 318 अंकावर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांकाने 16200 चा टप्पा पार केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: