Share Market Updates: सोमवारी झालेल्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आज खरेदी जोर दिसत असून निर्देशांक वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 94 अंकांच्या तेजीसह 61,234 अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 21 अंकांच्या तेजीसह 18,180 अंकांवर खुला झाला. आज, पेटीएम कंपनीच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली.
बाजारातील व्यवहारांना आज सुरुवात झाल्यानंतर बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, इन्फ्रा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, आयटी, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 170 अंकांच्या तेजीसह 61,315.47 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 52.40 अंकांच्या तेजीसह 18,212.35 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 22 कंपन्यांचे शेअर वधारले. तर, आठ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टी 50 मध्ये 35 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 14 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. तर, एका कंपनीच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
आज बाजारात अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात 1.98 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, एल अॅण्ड टी 0.81 टक्के, इंडसइंड बँक 0.78 टक्के, मारुती सुझुकी 0.75 टक्के, एचयूएल 0.70 टक्के, डॉ. रेड्डी लॅब 0.68 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 0.64 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.63 टक्क्यांनी वधारला आहे.
तर, पॉवरग्रीडच्या शेअर दरात 0.64 टक्के, सन फार्मा 0.50 टक्के, नेस्ले 0.58 टक्के, कोटक महिंद्राच्या शेअर दरात 0.27 टक्के, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 0.23 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. टाटा स्टीलच्या शेअर दरात 0.14 टक्के, विप्रोच्या शेअर दरात 0.10 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. पेटीएमसच्या शेअर दरात आज मोठी घसरण दिसून आली. पेटीएमचा शेअर दर 535 रुपयांवर खुला झाला होता. त्यानंतर शेअरने 537 रुपयांचा दर गाठल्यानंतर घसरण दिसून आली. पेटीएमच्या शेअरने 483.20 रुपयांचा नीचांकी दर गाठला. हा दर 52 आठवड्यातील सर्वाधिक नीचांकी दर आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: