Share Market Updates : मागील काही दिवस घसरण पाहिलेल्या शेअर बाजारात आज पुन्हा तेजी दिसून आली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर वधारले होते. आज सकाळी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीने सकारात्मक संकेत दिले होते. दुपारीदेखील शेअर बाजार वधारलेला दिसून आला. 


सेन्सेक्सने आज दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास 1089 अंकांनी म्हणजे 2.04 टक्क्यांनी वधारला होता. तर, निफ्टी 243 अंकांनी वधारला. 


सेन्सेक्समध्ये टेक महिंद्रा (Tech Mahindra), रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड (RIL), सन फार्मा (Sun Pharma), इन्फोसिस (Infosys), डॉ. रेड्डीजचे (Dr Reddy's) शेअर्स वधारले होते. तर, दुसरीकडे पॉवरग्रिड (PowerGrid) , टाटा स्टील (Tata Steel), एशियन पेंट्स  (Asian Paints)  आणि कोटक महिंद्रा बँकेच्या (Kotak Mahindra Bank)  शेअरमध्ये घसरण दिसून आली. 


दरम्यान, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 8142.60 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मंगळवारी बाजार बंद होताना वधारला होता. सोमवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 581.34 अंकांनी तर निफ्टीही 150.30 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये 1.10 टक्क्यांची, तर निफ्टीमध्ये 0.95 टक्क्यांची वाढ झाली. 


आज सकाळी काय होता ट्रेंड?


आज, बँक निफ्टी, मेटल आणि खासगी बँकांचे क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील सर्व शेअर वधारले होते. मीडिया सेक्टरमधील शेअर्स 2.4 टक्क्यांनी वधारले होते. हेल्थकेअर इंडेक्समध्येही तेजी दिसून आली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha