Share Market Opening : शेअर बाजारात आज पुन्हा एकदा तेजीने सुरुवात झाली आहे. गुरुवारी बाजार बंद होताना असलेला खरेदीचा जोर आजही दिसून आला आहे. शेअर बाजारात आजही खरेदीचा जोर राहण्याचे संकेत आहेत. 


आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स  54,574.43 अंकांवर खुला झाला. तर, एनएसई निफ्टीचा निर्देशांक 16,273.65  च्या पातळीवर खुला झाला. निफ्टीने आज बाजार सुरू झाल्यानंतरच्या काही वेळेत 16200 अंकांचा स्तर ओलांडला. 


प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजार 394 अंकांनी वधारला. तर,  निफ्टी निर्देशांक 97.80 अंकांनी वधारला होता. 


आज शेअर बाजारातील व्यवहाराच्या दरम्यान, निफ्टी 50 पैकी 40 शेअरमध्ये तेजी असल्याचे दिसून आले. तर, 10 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण असल्याचे दिसून येत आहे. बँक निफ्टी 289 अंकांनी वधारला. बँक निफ्टी 35,209 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. 


आज मेटल आणि रियल्टी सेक्टर वगळता इतर सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसत आहे.  बँक आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसत आहे. तर, ग्राहकोपयोगी वस्तूंचे शेअर दर वधारले आहेत. 


एल अॅण्ड टी, कोल इंडिया, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट आदी कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली आहे. टाटा स्टील, मारुती, जेएसडब्लू स्टील, एशियन पेंट्स आणि आयशर मोटर्सच्या शेअर दरात घसरण झाल्याचे चित्र आहे. 


दरम्यान, गुरुवारी  सेन्सेक्समध्ये 427 अंकांची वाढ झाली तर  निफ्टीमध्ये 143 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.80 टक्क्यांची वाढ होऊन तो 54,178 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.89 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,132 वर स्थिरावला. गुरुवारी 2201 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1013 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तर 146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: