Nagpur Crime : एक महिला व पुरूषाची हत्या करून त्यांचे मृतदेह वेणा नदीत फेकून दिल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत रुई खैरी शिवारात घडली आहे. या दोघांचेही हातपाय एकाच नायलॉन दोरीने बांधून ठेवले होते. साधारण 25 ते 30 वयोगटातील दोघांची ओळख अजून पटलेली नाही.
नदीपात्रात दोन मृतदेह तरंगताना दिसले
रुई खैरी या ठिकाणी काल वेणा नदीच्या पुलावरून जात असताना एका व्यक्तीला नदीपात्रात दोन मृतदेह तरंगताना दिसून आले. त्याने लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृतांचे अंदाजे वय 25 ते 30 वर्ष असावे. या दोघांना एकाच नायलॉन दोरीने बांधलेले होते...
पोलिसांकडून संशय व्यक्त
घटनेचे गांभीर्य ओळखून नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर हे ही घटनास्थळी पोहोचले होते. दोघांची इतरत्र हत्या करून मृतदेह दगडाला बांधून नदीत फेकून दिले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेला किमान 8 ते 10 तास झाले असावेत, असा संशय ही पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणं सुरू केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Crime News : एकाला संपवण्यासाठी सहा जण जमले एकत्र, सिगारेट दिले नाही म्हणून मास्टरमाईंडचाच काढला काटा
Crime: आधी पत्नीला संपवलं, त्यांनतर तिनेच जीव दिल्याचा व्हाट्सअपला स्टेट्स ठेवला; पण पोलिसांच्या...
Chandrashekhar Guruji : चंद्रशेखर गुरुजींच्या दोन मारेकऱ्यांना अटक, हत्येमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं स्पष्ट