Share Market Updates : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण सुरूच राहिली आहे. दुपारी सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण दिसून आली. परदेशी गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू ठेवला आहे. तर, दुसरीकडे आशियाई बाजारातही घसरण सुरू आहे. त्याच्या परिणामी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे. बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे दोन शेअर्सचे दर वधारले आहेत.
दुपारी 12.20 वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये 798.28 अंकांची घसरण दिसून आली. यावेळी सेन्सेक्स 57,851 अंकांवर ट्रेड करत होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टीमध्येही 59.85 अंकांची घसरण झाली होती.
हे दोन शेअर्स वधारले
शेअर बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि एनटीपीसीच्या (NTPC) शेअर वधारले असल्याचे दिसून आले. SBI च्या शेअरमध्ये 2.40 टक्क्यांनी उसळण दिसून आली. त्यावेळी SBI चा शेअर दर 542.95 रुपयांवर ट्रेड करत होता. तर, एनटीपीसीचा शेअर 1.23 टक्क्यांनी वधारला. त्यावेळी 135.90 रुपयांवर हा शेअर ट्रेड करत होता. एसबीआयचे चौथ्या तिमाहीचे चांगले निकाल जाहीर झाले होते. तर, राजस्थानमधील एनटीपीसीच्या सोलर प्लांटमधून निर्मिती सुरू झाली आहे.
सकाळच्या सत्रात घसरण
सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये सुमारे दोन टक्क्यांची सर्वात मोठी घसरण बजाज फायनान्समध्ये झाली. एचडीएफसी बँक, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, डॉ रेड्डीज, मारुती आणि एचडीएफसीच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या टप्प्यात घसरण झाली होती. दुसरीकडे टाटा स्टील, पॉवरग्रीड, एसबीआय आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्स दरात वाढ झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Facebook : ब्रिटनमध्ये फेसबुकला 15 कोटी पाउंडचा दंड, विकावी लागणार एक कंपनी
- LPG Cylinder : चांगली बातमी! 'या' महिन्यात गॅस सिलिंडर बुक करा, पुढील महिन्यात पैसे द्या
- PSU Privatization : येत्या आर्थिक वर्षात तीन सरकारी कंपन्यांचे खासगीकरण; तीन आयपीओही येणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha