Share Market Updates: सलग दोन दिवस तेजीत असणाऱ्या शेअर बाजारात आज घसरण दिसून आली. जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या नकारात्मक वातावरणाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून झाला. शेअर बाजाराची सुरुवात गॅप डाऊनने झाली. अमेरीकी फेडरल बॅंकेच्या प्रमुखांकडून महागाई तातडीनं नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर बाजारात पुन्हा अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

बीएसईचा 30 शेअरचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 379 अंकानी घसरला. सेन्सेक्स 57531 च्या पातळीवर सुरू झाला. एनएसईचा 50 शेअर इंडेक्स निफ्टीमध्ये 150 अंकाची घसरण झाली. निफ्टीमध्ये 17,242.75  अंकावर पातळीवर व्यवहार झाला आहे. 

आज बँक, वित्तीय सेवा, आयटी आणि ऑटो क्षेत्रात घसरण दिसून येत आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. बँक निफ्टीत 409 अंकाची घसरण दिसून आली. 

निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली. बाजारातील व्यवहार सुरू होताच 15 मिनिटानंतरही यामध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास 50 पैकी 6 शेअरमध्ये तेजी दिसून आली.  

गुरुवारी शेअर बाजारात तेजी

शेअर बाजारातील सर्वच शेअर्समध्ये गुरुवारी वाढ झाल्याने शेअर बाजार चांगलाच वधारल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 874 अंकांनी तर निफ्टीही 256 अंकानी वधारला होता. सेन्सेक्समध्ये 1.53 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,911 वर , तर निफ्टीमध्ये 1.49 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,392 वर पोहोचला. 

गुरुवारी 2252 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर, 1089 शेअर्समध्ये घसरण झाली आहे.  जवळपास 96 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

गुरुवारी बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक, आयटी, फार्मा यासह सर्वच सेक्टरच्या शेअर्समध्ये 1-2 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही एक टक्क्यांची वाढ झाली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: