Share Market Updates : आशियाई बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 226 अंकांची उसळण दिसून आली होती. मात्रष काही वेळेतच नफा वसुली सुरू झाल्याने सेन्सेक्स घसरला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. 


शेअर बाजारात बँकिंग, ऑटो, आयटी, रिअल इस्टेट, मेटल्स, एनर्जी, कमोडिटीसारख्या क्षेत्रातील स्टॉक्सचे दर वधारले आहेत. स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये खरेदीचा कल दिसत आहे. तर, फार्मा, एफएमसीजीमध्ये घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअरमध्ये तेजी दिसून येत होती. तर, 14 शेअरमध्ये घसरण दिसत होती. तर, निफ्टीतील 50 शेअरमधील 28 शेअरमध्ये तेजी दिसत आहे. तर, 22 शेअरमध्ये घसरण दिसत होती. 


वधारणारे शेअर्स


महिंद्रा, एअरटेल, एसबीआय, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टीलमध्ये तेजी दिसत आहे. 


घसरणारे शेअर्स


टायटन, मारुती सुझुकी, नेस्ले, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रीड, एशियन पेंट्स, आयटीसी, डॉ. रेड्डी लॅब, आयसीआयसीआय बँकेंच्या शेअरमध्ये घसरण दिसत आहे.   


गुरुवारी काय होती स्थिती?


गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काही अंशी घसरण झाली. शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 89 अंकांनी, तर निफ्टीही 22 अंकानी घसरला होता. सेन्सेक्समध्ये 0.15 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,595.68 वर पोहोचला होता. तर,  निफ्टीमध्ये 0.13 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,222.75 वर पोहोचला.  गुरुवारी 1426 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1888 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 100 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.  बंद होताना मेटल, आयटी, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांनी वाढ झाली. तर बँकेच्या इंडेक्समध्ये 1 टक्क्यांची घट झाली.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha