Share Market Updates : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात अतिशय नकारात्मक झाली. शेअर बाजार जवळपास 1500 अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. जागतिक शेअर बाजारातही घसरण असल्याचे दिसून आले. त्याच्या परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाल्याचे दिसून आले. त्याशिवाय देशांतर्गत कारणांचाही शेअर बाजारावर परिणाम झाला.
सकाळी 9.17 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1231.66 अंकांची म्हणजे 2.12 टक्क्यांनी घसरण झाली. तर, निफ्टी 298.60 अंक म्हणजे जवळपास 1.72 टक्क्यांनी घसरण झाली. शेअर बाजारातील इतर घटकांचा परिणाम होत असतो. या शिपिंग घोटाळ्याचा परिणाम बँक निफ्टीवर होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय जागतिक शेअर बाजारामध्येही घसरण दिसून आली आहे. SGX हा 1.5 टक्क्यांनी घसरला आहे.
अमेरिकेतील महागाई, युक्रेन तणावासह अनिल अंबानी यांच्यासह इतर चार जणांवर सेबीने शेअर बाजारात व्यवहार करण्यास केलेल्या मनाईचाही परिणाम बाजारातील व्यवहारावर होऊ शकतो.
शिपयार्ड घोटाळ्याचा परिणाम?
मागील काही दिवसांपासून सातत्याने अस्थिर असलेल्या शेअर बाजारातील सोमवारच्या व्यवहारावर ABG शिपयार्ड घोटाळ्याचे सावट आहे. ABG शिपयार्डने तब्बल 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्याचा परिणाम शेअर बाजारावर होणार असल्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- फक्त दरमहा एक रुपयांत दोन लाख रुपयांचा विमा मिळवा; जाणून घ्या कसे ते
- EPFO Facility : पीएफ खात्यातूनही विमा पॉलिसीचा हप्ता भरता येतो, काय आहे EPFO ची 'ही' सुविधा, जाणून घ्या
- Tata Sons: टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांना पाच वर्षांची मुदतवाढ; कार्यकारी मंडळाचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha