Bonus For Weight  Loss :  कर्मचारी निरोगी असले की त्यांची कार्य उत्पादकता अधिक वाढते. ही बाब लक्षात घेऊन अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी उपक्रम राबवतात. ऑनलाइन ब्रोकरेज फर्म असलेल्या झिरोधाने आपल्या कर्मचाऱ्यांना फिट ठेवण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. वजन कमी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा झिरोधाने केली आहे. 


कंपनीने या विशेष कार्यक्रमाचे नाव फन हेल्थ प्रोगाम (Fun Health Program) असे ठेवण्यात आले आहे. झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी सांगितले की, आपल्या कर्माऱ्यांना अधिक फीट ठेवणे हा आमचा उद्देश्य आहे. त्यांना आपल्या आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. झिरोधाच्या कर्मचाऱ्यांनी ऑगस्टपर्यंत आपलं वजन कमी केल्यास त्यांना 15 दिवसाचा पगार हा बोनस म्हणून दिला जाणार आहे. इतकंच नव्हे तर सर्व कर्मचाऱ्यांचे सरासरी बॉडी इंडेक्स 24 पर्यंत आल्यास झिरोधा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस देणार आहेत. 


ट्वीट करून दिली माहिती 


नितीन कामथ यांनी  आपल्या कंपनीने सुरू केलेल्या उपक्रमाची माहिती ट्वीट करून दिली. नितीन कामथ यांनी म्हटले की, झिरोधा एक विशेष फन हेल्थ कार्यक्रम राबवत आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना फिट ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. फन हेल्थ प्रोग्राम नुसार, झिरोधा कर्मचारी जर आपलं वजन कमी करत असतील तर त्यांना बोनसचा लाभ मिळू शकतो. 


बोनससाठी काय करावं लागणार?


झिरोदा कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्यासाठी वजन कमी करावे लागणार आहे. नितीन कामत यांनी ट्विटमध्ये सांगितले की, त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सरासरी बॉडी मास इंडेक्स (BMI) 25.3 आहे. जर झिरोधाच्या कर्मचाऱ्यांचा सरासरी BMI ऑगस्ट महिन्यापर्यंत 24 च्या खाली आला तर सर्व कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून 15 दिवसांचा पगार मिळेल.  नितीन यांनी सांगितले की, जरी BMI हे आरोग्याचे अचूक मोजमाप नसले तरी निरोगी जीवन जगण्याचा हा सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो.