Veranda Learning Solutions IPO : Veranda Learning Solutions च्या आयपीओची (IPO) लिस्टिंग स्टॉक एक्स्चेंजवर खूप वेगानं झाली आहे. मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर कंपनीचं लिस्टिंग 14.60 टक्क्यांनी वाढून 157 रुपयांवर होत होतं. मात्र, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर शेअरची लिस्टिंग 8.7 टक्क्यांनी घसरून 125 रुपये प्रति शेअर झाली आहे. सध्या हा शेअर 20 टक्क्यांच्या वाढीसह 164 रुपयांवर व्यवहार करत आहे.
व्हरांडा लर्निंग सोल्युशन्सचा आयपीओ 137 रुपये प्रति शेअर दरानं आला होता. कंपनीने 200 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता, जो 29 ते 31 मार्च दरम्यान ओपन करण्यात आला आणि 3.53 पटींनी सब्सक्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव कोटा 10.76 टक्के, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 3.87 टक्के आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव कोटा 2.02 टक्क्यांनी सब्सक्राइब करण्यात आला होता.
2020-21 या आर्थिक वर्षासाठी, व्हरांडाने 2.54 कोटी रुपयांच्या महसुलावर 8.3 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. तर सप्टेंबर 2021 ला संपलेल्या सहा महिन्यांत 15.46 कोटी रुपयांच्या महसुलावर 18.3 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. एड्युरेकाच्या अधिग्रहणासाठी पैसे खर्च करण्याव्यतिरिक्त, विस्तार योजनेवर लक्ष केंद्रीत केलं जाईल. दरम्यान, व्हरांडा लर्निंग सोल्युशन्स संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, बँकिंग, विमा, रेल्वे आणि चार्टर्ड अकाउंटन्सीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन अभ्यासक्रम ऑफर करते.
'व्हरांडा लर्निंग सोल्युशन्स' (Veranda Learning Solutions) कंपनीचं काम काय?
व्हरांडा लर्निंग सोल्युशन्स हा ऑनलाइन शिक्षण मंच आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये सोबीकडे आयपीओचा ड्राफ्ट पेपर दाखल केला होता. आयपीओच्या माध्यमातून 200 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. आयपीओमधून मिळणारी रक्कम कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी आणि एड्युरेकाच्या अधिग्रहणावर झालेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी वापरली जाईल.
व्हरांडा लर्निंग सोल्युशन्स विद्यार्थी, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट कर्मचार्यांना विविध प्रकारचे शिक्षण प्रदान करते. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, कंपनी विविध राज्यांतील लोकसेवा आयोग, स्टाफ सेलेक्स कमिशन, बँकिंग, विमा, रेल्वे आणि CA ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग सुविधा देखील पुरवते.