मुंबई : मंगळवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा (Share Market) निर्देशांक निफ्टीमध्ये (NIFTY) 92 अंकांची वाढ झाली असून 23558 अंकांवर स्थिरावला. त्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनेही (Sensex) 308 अंकांनी झेप घेत 77301 अंकापर्यंत मजल मारली. निफ्टीमध्ये मंगलवार टॉप गेनर्सच्या श्रेणीत श्रीराम फायनान्स, पॉवर ग्रिड, विप्रो, टायटन, आयसीआयसीआय या कंपन्याच राहिल्या. तर मारुती सुझूकी, टाटा स्टील, अल्ट्राटेक सीमेंट, टाटा मोटर्सचे शेअर्स पडले. दरम्यान, बुधवारीदेखील शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. बुधवारी काही पेनी स्टॉक्स चांगली कामगिरी करतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी अपर सर्किट लागलेल्या 10 पेनी स्टॉक्सबद्दल (Penny Stocks) जाणून घेऊ या. हे शेअर्स बुधवारीही चांगली कामगिरी करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 


 हे पेनी स्टॉक्स बुधवारीही दमदार कामगिरी करण्याची शक्यता


BGIL Films And Technologies Ltd या कंपनीचा शेअर मंगळवारी 5.92 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये 19.84 टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. .


Integra Essentia Ltd कंपनीचा सेअर मंगळवारी 1.42 रुपयांवर पोहोचला. मंगळवारी या शेअरमध्ये 19.33 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली. 


Tranway Technologies Ltd चा शेअर मंगळवारी 8.61 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये 9.96 टक्क्यांची तेजी आली. 


JLA Infraville Shoppers Ltd या कंपनीचा शेअर मंगळवारी 4.98 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये 9.93 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. 


Diligent Media Corporation Ltd कंपनीचा शेअर मंगळवारी 5.54 रुपयांवर पोहोचला. मंगळवारी या शेअरमध्ये 9.92 टक्क्यांती तेजी आली. 


Ashirwad Capital Ltd हा शेअरही मंगळवारी 8.09 रुपयांवर पोहोचला. मंगळवारी ही तेजी 9.92 टक्के होती. 


Diksha Greens Ltd या कंपनीचा शेअर मंगळवारी  2.94 रुपयांवर पोहोचला. मंगळवारची ही तेजी एकूण 9.7 टक्के होती. 


Samtex Fashions Ltd या कंपनीचा शेअर मंगळवारी  2.61 रुपयांवर पोहोचला. मंगळवारी या शेअरमध्ये 9.66 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.  


Procal Electronics India Ltd या कंपनीचा शेअर पाच टक्क्यांच्या तेजीसह 0.63 रुपयांवर पोहोचला.


 Bronze Infra-Tech Ltd या कंपनीचा शेअरही मंगळवारी  पाच टक्क्यांच्या तेजीसह 1.26 रुपयांवर पोहोचला.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

 

हेही वाचा :