Penny Stock Order: शेअर बाजारात (Share Market) अशा काही कंपन्या असतात ज्यांच्या शेअरचे मूल्य हे कमी असते मात्र त्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. विशेष म्हणजे शेअर्स फार चर्चेतही नसतात. सध्या अंशुनी कमर्शियल्स लिमिटेड नावाची ही कंपनी अशीच चर्चेत आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी अंशुनी कमर्शियल्स (Anshuni Commercials) या कंपनीचा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 1.44 रुपयांवर पोहोचला होता. सध्या या कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. याच कारणामुळे या कंपनीच्या शेअरचे मूल्य वाढले आहे. 


कंपनीला मिळाली 682 कोटीची ऑर्डर


मिळालेल्या माहितीनुसार अंशुनी कमर्शियल्स या कंपनीला म्यूनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) या कंपनीकडून तब्बल 682 कोटी 15 लाख रुपयांची नवी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची पूर्तता अंशुनी कमर्शियल्सला ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2030 या कालावधीत पूर्ण करायची आहे.


या कंपनीच्या शेअरचा परफॉर्मन्स काय? 


अंशुनी कमर्शियल्स कंपनीचा शेअर शुक्रवारी 1.44 रुपयांवर पोहोचला. गेल्या तीन महिन्यांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना  60 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत. या शेअरचे 52 आठवड्यांतील सर्वोच्च मूल्य 1.44 रुपये तर 52 आठवड्यांतील निचांकी मूल्य 0.88 रुपये आहे. सध्या या कंपनीचे बाजार भांडवल 0.17 कोटी रुपये आहे. तिमाही निकालानुसार FY24 च्या चौथ्या तिमाहीत अंशुनी कमर्शियल्स कंपनीने 0.01 कोटी रुपयांची कमाई केली. 


अंशुनी कमर्शियल्स कंपनी नेमकं काय करते? 


अंशुनी कमर्शियल्स ही कंपनी हिरे घडवण्याचे काम करते. व्हीव्हीएसपासून ते I2 गुणवत्तेचे पॉलिश केलेले हिरे ही कंपनी घडवते. आगामी काळातही या कंपनीला आणखी मोठ्या ऑर्डर्स मिळाल्यावर या कंपनीचा शेअर आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


टेलिग्राम, व्हॉट्सॲप ग्रुपच्या सल्ल्यानुसार शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सावधान, NSE ने केलं सतर्क!


PM Kisan Nidhi : मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज येणार 2000 रुपये


बापरे! एक लाखाचे झाले तब्बल 29 लाख रुपये, 'या' कंपनीच्या शेअर्समुळे तुम्ही झाले असता मालामाल!