List of Bank Holidays in June 2024: मे महिन्याचे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या (June Bank Holidays) होत्या. आगामी जून महिन्यातही बँकांना बऱ्याच सुट्ट्या असणार (Bank Holidays) आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी बँकेशी संबंधित कामांचे आताच नियोजन करणे गरजेचे आहे. कारण तसे न केल्यास ऐनवेळी तुमची फजिती होऊ शकते.


एकूण दहा दिवस बँका राहणार बंद


जून महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. रिझर्वह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार जून महिन्यात बँका एकूण दहा दिवस बंद असणार आहेत. म्हणजेच उरलेल्या 21 दिवसांतच तुम्हाला तुमचे बँकेचे काम करावे लागेल. या दहा दिवसांच्या सुट्टीमध्ये राष्ट्रीय, क्षेत्रीय सुट्ट्या तसेच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार या सुट्यांचा समावेश आहे. या एकूण दहा सुट्ट्या खालीलप्रमाणे आहेत. 
या तारखांना बँका राहणार बंद 
 
2 जून 2024, रोजी रविवार आहे. तसेच हा दिवस तेलंगणात तेलंगाना स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी तेलंगणा तसेच संपूर्ण देशात बँका बंद असतील 


9 जून 2024 रोजी रविवार आहे. तसेच या दिवशी महाराणा प्रताप यांची जयंती आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, हरियाणा तसेच राजस्थानमध्ये आणि संपूर्ण देशात बँकांना सुट्टी आहे.  


यासह 10 जून 2024 रोजी सोमवार असून या दिवशी श्री गुरु अर्जुन देव यांचा बलीदान दिन आहे. त्यामुळे या दिवशी पंजाबमध्ये बँका बंद असतील. 


14 जून 2024 रोजी उडिसा राज्यात बँका बंद असतील.
 
15 जून 2024 रोजी शनिवार आहे. या दिवसी उडिसा राज्यात बँका बंद असतील. 


5 जून रोजी वायएमए दिवस आहे. या दिवशी मिझोरम राज्यात बँका बंद असतील.


17 जून 2024 रोजी बकरी ईदच्या निमित्ताने काही राज्ये वगळता संपूर्ण देशात बँकांना सुट्टी आहे. 


21 जून 2024 रोजी शुक्रवार आहे. या दिवश वटसावित्री वृत्त आहे. त्यामुळे अनेक राज्यांत या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे. 


22 जून 2024 रोजी शनिवार आहे. या दिवशी संत गुरु कबीर जयंती असल्यामुळे छत्तीसगढ़, हिमाचल प्रदेश, हरियाणा पंजाब राज्यात बँका बंद असतील. 


30 जून 2024 रोजी रविवार आहे. त्यामुळे या दिवशीही बँका बंद असतील. 


हेही वाचा :


गुंतवणुकीच्या 'या' फॉर्म्यूल्याचा विषय खोल, डोकं लावल्यास तुम्हीही व्हाल करोडपती!


स्वप्नातलं घर घेण्यासाठी कर्ज हवंय? सर्वांत कमी व्याज घेणाऱ्या 'या' पाच बँकांचा व्याजदर काय?


गुगलची भारतावर नजर! विस्तारासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; फ्लिपकार्टलाही होणार फायदा