मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तथा आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) नेहमीच चर्चेत असतो. धोनी कधी एकदा फलंदाजीसाठी मैदानात येतो, असे त्याच्या चाहत्यांना वाटत असते. तो मैदानात जशा प्रकारे सजग राहून धावांचा पाऊस पाडतो, अगदी तशाच पद्धतीने तो वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवतो. धोनी अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणूनदेखील काम करतो. धोनी आता नव्या भूमिकेत दिसणार असून तो अशाच एका कारनिर्मिती करणाऱ्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून काम करणार आहे. 


महेंद्रसिंह धोनी आता कार कंपनीचा ब्रँड अॅम्बेसिडर


धोनीचे वेगवेगळ्या गाड्यांवरील प्रेम लपून राहिलेले नाही. त्याच्याकडे अनेक महागड्या दुचाकी आणि चारचाकी आहेत. त्याने काही दिवासांपूर्वी इलेक्ट्रिक सायकल तयार करणाऱ्या पुण्यातील एका कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. त्यानंतर आता तो मुळच्या फ्रान्समधील सिट्रॉन या कारनिर्मिती करणाऱ्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसिडर झाला आहे. याबाबत या कंपनीने सविस्तर माहिती दिली आहे. धोनी लवकरच आमच्यासोबत असेल असे, सिट्रॉन कंपनीने सांगितले आहे. 


सिट्रॉन इंडियाचे डायरेक्टर शिशिर मिश्रा यांनी सांगितले की, महेंद्रसिंह धोनी हा भारतातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यामुळे तो आमच्यासोबत आल्याने आमची बांधिलकी मजबूत होईल. त्यांची विनम्रता आणि त्यांची उत्कृष्टता आमच्या ब्रँडला पुरक ठरणारी आणि आमच्याशी जुळणारी आहे. 


कंपनीने नेमकं काय सांगितलं?


सिट्रॉन या कंपनीने याबाबत एक ट्विटदेखील केलं आहे. आता हे अधिकृत झाले आहे. 2007 ते 2011 हा काळ आमच्या कायम स्मरणात आहे. आम्ही क्रिकेटवर प्रेम करतो. महेंद्रसिंह धोनी आमचे कॅप्टन म्हणून परत आले आहेत. आतापर्यंत कधीही न झालेली टीम ते आमच्यासोबत तयार करणार आहेत. धोनी रिटायर होणार नाहीत. ही तर त्यांची नवी सुरुवात आहे, अशा आशयाचं ट्वीट सिट्रॉन कंपनीने केलंय. ब्रँड अॅबेसिडरच्या नव्या जबाबदारीबद्दल धोनीनेही प्रतिक्रिया दिली आहे. हा ब्रँड माझ्या विचारांच्या अनुरुप आहे. हा ब्रँड माझ्याप्रमाणेच वास्तवात जे गरजेचं आहे त्यावरच लक्ष देतो, असं धोनीने म्हटलंय.  


हेही वाचा :


गुंतवणुकीच्या 'या' फॉर्म्यूल्याचा विषय खोल, डोकं लावल्यास तुम्हीही व्हाल करोडपती!


स्वप्नातलं घर घेण्यासाठी कर्ज हवंय? सर्वांत कमी व्याज घेणाऱ्या 'या' पाच बँकांचा व्याजदर काय?


गुगलची भारतावर नजर! विस्तारासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; फ्लिपकार्टलाही होणार फायदा