मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या फीमध्ये वाढ केल्यानं आयटी कंपन्यांचे स्टॉक कोसळले आहेत. त्यामुळं भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु होती. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेबाहेर निर्मिती झालेल्या औषधांवर 100 टक्के टॅरिफ लादलं आहे. ज्या कंपन्या अमेरिकेत निर्मिती करतील त्यांना टॅरिफ द्यावं लागणार नाही किंवा ज्यांचे प्रकल्प अमेरिकेत सुरु होणार आहेत. त्यांना देखील टॅरिफ द्यावं लागणार नाही. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फटका भारतीय शेअर बाजाला बसला आहे. फार्मा आणि आयटी शेअरची जोरदार विक्री झाली. 

Continues below advertisement

Trump Tariff on Medicine : ट्रम्प टॅरिफमुळं शेअर बाजारात घसरण

भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 733 अंकांची घसरण झाली तर निफ्टी 50 देखील 236.15 अंकांनी घसरुन 24654.70 अंकांवर आला. औषध कंपन्यांवर  1 ऑक्टोबरपासून 100 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. त्यामुळं भारतीय शेअर बाजारातील बहुतांश स्टॉक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. बीसीएई हेल्थकेअर निर्देशांक 2.14 टक्क्यांनी घसरला. तर, वोकहार्टच्या स्टॉकमध्ये 9.4 टक्क्यांची घसरण झाली. 

सेन्सेक्सवरील महिंद्रा अँड महिंद्रा, इटर्नल, टाटा स्टील, बजाज फायनन्स, एशियन पेंट्स, सन फार्मा, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेकच्या शेअरमध्ये घसरण झाली. लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, आयटीसी आणि रिलायंस इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.  

Continues below advertisement

एनरिच मनीचे सीईओ पोनमुडी आर यांनी ब्रँडेड आणि पेंटट असणऱ्या औषधांच्या आयातीवर 100 टक्के टॅरिफ लादल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री झाल्यानं घसरण झाली. आयटी कंपन्यांच्या स्टॉकमध्ये देखील विक्री झाली आहे. 

दरम्यान,  ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय औषध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात अमेरिकेला केली जाते. आता ट्रम्प यांच्या या निर्णयानं अमेरिकेतील बाजारपेठेत भारतीय कंपन्यांची औषधं महाग होऊ शकतात. दुसरीकडे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार लवकरच होण्याची शक्यता आहे. त्याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरु आहेत.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)