नवी दिल्ली: शेअर मार्केटमध्ये (Share Market) सध्या आयपीओचा (IPO) बोलबाला आहे. यूनिकॉमर्स, प्रीमियम एनर्जीज, बजाज हाऊसिंग फायनान्स आणि पीएन गाडगीळ ज्वेलर्स या कंपन्यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना परतावा दिलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे आयपीओ लिस्ट झालेला आहे. आता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या (NTPC) एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा (NTPC Green Energy) आयपीओ लवकरच येणार आहे. एनटीपीसीनं कागदपत्रं सेबीला सादर केली आहेत. 


नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या एनटीपीसी ग्रीन एनर्जीजच्या आयपीओद्वारे 10 हजार कोटी रुपये उभारणार आहे. यासाठीची कागदपत्र सेबीला सादर करण्यात आली आहेत. सेबीकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार नव्या इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. यामध्ये  ऑफर फॉर सेल पर्याय उपलब्ध नसेल. एनटीपीसी ग्रीन एनर्जी या कंपनीकडून गुंतवणुकीतून मिळणाऱ्या 7500 कोटी रुपयांचा वापर एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या काही कर्जाची परतफेड केली जाणार आहे. तर, उर्वरित रक्कम कंपनीच्या इतर कामांसाठी केला जाणार आहे.  


यंदा शेअर बाजारात आयपीओचं जोरदार लिस्टींग


यंदा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर आयपीओ लिस्ट झाले आहेत. आतापर्यंत 60 मोठ्या कंपन्यांच्या आयपीओचं लिस्टींग झालं आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी केंद्र सरकारच्या महारत्न कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीकडे सहापेक्षा अधिक राज्यांमध्ये सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा प्रकल्प आहेत. ऑगस्टच्या आकडेवारीनुसार एनटीपीसी ग्रीन एनर्जीची वीज निर्मिती क्षमता 3171 मेगावॅट इतकी होती.  


आयपीओमधून गुंतवणूकदारांना कमाईची दमदार संधी


गेल्या काही दिवसांमध्ये मोठ मोठ्या कंपन्यांची आयपीओ शेअर बाजारत लिस्ट झाले आहेत. यूनिकॉमर्स, प्रीमियम एनर्जीज, बजाज फायनान्स आणि पीएन गाडगीळ ज्वेलर्स या कंपन्यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. सर्वाधिक रिटर्न प्रीमियम एनर्जीजच्या आयपीओनं दिले. त्या खालोखाल यूनिकॉमर्सनं देखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. बजाज हाऊसिंग फायनान्सनच्या आयपीओवर ज्यांनी पैसे लावले त्यांना दुप्पट रक्कम मिळाली. तर, दुसरीकडे पीएन गाडगळी ज्वेलर्स या कंपनीच्या आयपीओमधून दमदार रिटर्न गुंतवणूकदारांना मिळाले आहेत. 


दरम्यान, आगामी काळात एनएचपीसी, ओएनजीसी,हिरो फिनकॉर्प, एचडीएफसी बँक, कॅनरा बँक यांच्यासह वेगवेगळ्या कंपन्याचे आयपीओ शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार आहेत.


इतर बातम्या :


पाच शेअर करणार धमाका! पैसे गुंतवल्यास देणार दमदार रिटर्न्स; जाणून घ्या स्टॉप लॉस, टार्गेट किती?


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)