Share Market Closing Bell:  सलग सहाव्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. आज सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांक गाठला. बाजारात आज दिवसभर तेजी दिसून आली तरी नफावसुलीमुळे काही प्रमाणात ब्रेक लागला. बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 184  अंकांच्या तेजीसह 63,284  अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 54 अंकांच्या तेजीसह 18,812 अंकांवर स्थिरावला.


बाजारातील व्यवहार थांबला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 17 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 13 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी 50 निर्देशांकातील 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 27 कंपन्यांचे शेअर दर घसरले. बँक निफ्टीनेदेखील उच्चांक गाठल्यानंतर नफावसुली दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांकाने आज 43,515.05 अंकांचा उच्चांक गाठला. बाजार बंद झाला तेव्हा बँक निफ्टी निर्देशांक 29.65  अंकांच्या तेजीसह 43,260.65 अंकांवर स्थिरावला. 


आज दिवसभरातील व्यवहारात आयटी, मेटल, रियल्टीच्या शेअर दरात खरेदीचा जोर दिसून आला. तर, एनर्जी, एफएमसीजी, ऑटो शेअरच्या दरात घसरण दिसून आली. ऑटो क्षेत्रातील खरेदी-विक्रीचे संमिश्र आकडे समोर आल्याने ऑटो कंपन्यांच्या शेअर दरावर विक्रीचा दबाव दिसून आला. 


डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी मजबूत झाला असून 81.22 रुपयांच्या स्तरावर बंद झाला. 


निफ्टी निर्देशांकात अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात 2.84 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, हिंदाल्कोच्या शेअर दरात 2.80 टक्के, टाटा स्टीलच्या शेअर दरात 2.69 टक्के, टीसीएसच्या शेअर दरात 2.43 टक्क्यांची तेजी दिसून आली. 


तर, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.41 टक्के, यूपीएलच्या शेअर दरात 1.41 टक्के, सिप्लाच्या शेअर दरात 1.37 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याशिवाय, आयशर मोटर्सच्या शेअर दरात 1.31 टक्के, बजाज ऑटोच्या शेअर दरात 1.22 टक्क्यांची घसरण दिसून आली. 


दरम्यान, गुरुवारी बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर तेजी कायम राहिली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांकाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 367 अंकांच्या तेजीसह 63,467 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 113 अंकांनी वधारत 18,871  अंकांवर खुला झाला.