Share Market: रशिया- युक्रेनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात काहीसं अस्थिरतेचे वातावरण दिसून आलं. शेअर बाजार बंद होताना आज डेव्हिस लॅब्ज, अदानी पोर्ट, ओएनजीसी, आयओसी आणि एचडीएफसी लाईफचे शेअर्स वधारले तर पॉवर ग्रिड, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, अल्ट्रा टेक सिमेंट या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.
शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 145 अंकांनी घसरला तर निफ्टीही 30 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,996 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.17 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,322 वर पोहोचला आहे.
आज बाजार बंद होताना ऑटो, बॅंक, मेटल, सार्वजनिक बँका आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली तर हेल्थकेअर, ऑईल ॲंड गॅस आणि रिॲलिटी क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली.
रशिया-युक्रेन तणावाचा परिणाम
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम जगभरातल्या शेअर बाजारांवर झाल्याचं दिसून येतंय. आज रशियाने युक्रेनच्य सीमेवरून आपले सैन्य माघार घेत असल्याची घोषणा केल्यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळाला असून कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर झाल्या आहेत.
आजचे टॉप गेनर्स
- Divis Labs- 3.22 टक्के
- Adani Ports- 2.80 टक्के
- ONGC- 2.68 टक्के
- IOC- 2.32 टक्के
- HDFC Life- 2.22 टक्के
आजचे टॉप लूजर्स
- Power Grid Corp- 3.51 टक्के
- NTPC- 1.59 टक्के
- ICICI Bank- 1.55 टक्के
- SBI- 1.54 टक्के
- UltraTechCement- 1.53 टक्के
महत्त्वाच्या बातम्या:
- Government Schemes : सरकारी योजना; दिवसाला 50 रुपयांची बचत केल्यास मॅच्युरिटीवर मिळतील 35 लाख रुपये
- गुंतवणूक करायची आहे? SBI MF ची मल्टी-कॅप योजना ठरु शकते फायद्याची, जाणून घ्या सर्वकाही
- लॉगिन न करता बँकेतील बॅलेन्स चेक करायचा आहे? SBI Yono चा 'असा' वापर करा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha