Share Market Todays Listing: शेअर बाजारात आज पडझड सुरू असताना दुसरीकडे आज दोन कंपन्या शेअर बाजारात (Share Market) सूचीबद्ध झाल्या आहेत. फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स (Five Star Business Finance) आणि आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज (Archean Chemical Industries) या दोन कंपन्यांची लिस्टिंग (Todays Listing In Share Market) झाली. मात्र, गुंतवणूकदारांसाठी या कंपन्यांची लिस्टिंग फारसी उत्साहजनक झाली नाही. काही दिवसांपूर्वी बिकाजी फूड्स आणि ग्लोबल हेल्थ या कंपन्यांची दमदार एन्ट्री झाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठी अपेक्षा होती. 


आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजची प्रीमियम दरावर लिस्टिंग 


आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजने शेअर बाजारात दमदारपणे पदार्पण केले. आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजचा शेअर 10 टक्के प्रीमियम दराने लिस्ट झाली. एनएसईवर 450 रुपये प्रति शेअर आणि बीएसईवर 449 रुपयांवर लिस्ट झाला. आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजचा आयपीओ 32.23 पटीने सब्सक्राइब झाला होता. 


आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज ही सागरी रसायनाचे उत्पादन करतात. ब्रोमिन, औद्योगिक क्षार आणि सल्फेटचे उत्पादन करण्यासह जगभरात याची निर्यातदेखील करण्यात येते. कंपनी गुजरातच्या किनार्‍यावरील कच्छच्या रणमधील मिठाच्या साठ्यातून उत्पादने तयार करते. कंपनीने 1,462 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी 386-407 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला होता.  आज बाजारात 450 रुपये प्रति शेअर या दराने सूचीबद्ध झाला. 


फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स डिस्काउंट दरात सूचीबद्ध


लघुउद्योगांना वित्तपुरवठा करणाऱ्या फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्सचा शेअर डिस्काउंट दरावर सूचीबद्ध झाला. बाजारात सूचीबद्ध होताना पाच टक्के शेअर दराच्या डिस्काउंट शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. 


फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स कंपनी ही लघु उद्योजक, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करते. कंपनीने आयपीओत 450 ते 474 रुपये इतका शेअर प्राइज बँड निश्चित केला होता. मात्र, बाजारात पाच टक्क्यांच्या डिस्काउंट दरावर लिस्ट झाला. 


बाजारात आज घसरण


दरम्यान, आज बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 207.15 अंकांच्या घसरणीसह 61,456.33 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 61.25  अंकांच्या घसरणीसह 18,246.40 अंकांवर खुला झाला. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 460 अंकांच्या घसरणीसह 61,202.94 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 134.20 अंकांच्या घसरणीसह 18,173.45 अंकांवर व्यवहार करत होता.