Share Market News: देशांतर्गत शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. बुधवारी शेअर बाजारातील (India Share Market) व्यवहार तेजीसह बंद झाले. अमेरिकेसह भारतातील महागाई दर कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. सेन्सेक्स (Sensex) 144.61 अंकांच्या तेजीसह 62,677.91 अंकांवर बंद झाला होता. तर, निफ्टी निर्देशांक (Nifty) 52.30 अंकांच्या तेजीसह 18,660.30 अंकांवर बंद झाला. 


टेक महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी, इंडसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पॉवरग्रीड, एचसीएल, टीसीएस आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली होती. आज कोणते शेअर्स तेजीत राहतील, याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. 


या शेअर्समध्ये तेजीचे संकेत


Moving Average Convergence Divergence (MACD) इंडिकेटर नुसार, व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea), आयडीएफसी बँक (IDFC First Bank), आरबीएल बँक (RBL Bank), गेल (GAIL) आणि फेडरल बँक (Federal Bank) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी राहण्याचे संकेत आहेत. MACD हे ट्रेंड रिव्हर्सलसाठी ओळखले जाते. MACD इंडिकेटरमध्ये सिग्नल लाइन ओलांडली की त्या शेअरमध्ये तेजी राहण्याचे संकेत समजले जातात. या MACD नुसार स्टॉकमधील संभाव्य तेजी आणि घसरण याचाही अंदाज लावता येतो. 


MACD इंडिकेटरनुसार, श्री रेणुका शुगर्स (Shree Renuka Sugars), आयआयएफएल फायनान्स (IIFL Finance), टुरिझम फायनान्स (Tourism Finance), झेन्सार टेक्नॉलॉजी ( Zensar Technologies) आणि गार्डन रिच शिपबिल्डर्स (Garden Reach Shipbuilders) या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण राहण्याची शक्यता आहे. 


या शेअरमध्ये खरेदीचे संकेत 


UCO Bank, GIC, Suzlon Energy, Punjab आणि Sind Bank या कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. या कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. 


बुधवारी बाजारात तेजी


बुधवारी, बँकिंग (Banking), आयटी (IT), मेटल्स (Metals) आणि एनर्जी (Energy) सेक्टरमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 144 अंकांच्या 62,678 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 58 अंकांच्या तेजीसह 18,660 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीने 44000 अंकांचा टप्पा ओलांडला. 


(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)