Share Market Prediction: भारतीय शेअर बाजारात मागील आठवड्यात घसरण दिसून आली. आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटचा दिवस शुक्रवार हा बाजारासाठी 'ब्लॅक फ्रायडे'  (Share Market Black Friday) ठरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (BSE Sensex )1000 अंकांची पडझड दिसून आली. शुक्रवारी, बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 980.93 अंकांच्या घसरणीसह 59,845.29 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 320.55 अंकांच्या घसरणीसह 17,806.80 अंकांवर बंद झाला. 


शुक्रवारी, सेन्सेक्स  60,205.56 अंकांवर खुला झाला होता. बाजारात किंचीत तेजी दिसून आली. मात्र, विक्रीच्या सपाट्यामुळे मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी फक्त एकाच कंपनीच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, उर्वरित 29 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांक 17,977.65 अंकावर खुला झाला होता. व्यवहारादरम्यान त्याने 18,050.45 अंकांच्या उच्चांक गाठला होता. बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 3 कंपन्यांचे शेअर दर तेजीत दिसून आले. तर, 47 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 


या शेअर्समध्ये तेजीचे संकेत


MACD इंडिकेटरनुसार, Vijaya Diagnostics, Ami Organics आणि Krishna Institute या कंपन्यांच्या शेअर दरात तेजीचे संकेत दिसून येत आहेत. त्याशिवाय, Abbott India च्या शेअर दरात तेजीचे संकेत दिसून येत आहेत.  


या शेअर्समध्ये दिसू शकतो विक्रीचा जोर


MACD इंडिकेटरनुसार, Yes Bank, Suzlon Energy, Indian Overseas, Central Bank आणि RBL Bank या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसू शकते. MACD नुसार या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसत आहे. त्याशिवाय, Century Textiles, Brightcom Group, TV18 Broadcast, Polyplex Corp या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण होण्याची शक्यता आहे. 


MACD इंडिकेटर काय आहे?


Moving Average Convergence/Divergence  (MACD) हे ट्रेंड रिव्हर्सलसाठी ओळखले जाते. MACD इंडिकेटरमध्ये सिग्नल लाइन ओलांडली की त्या शेअरमध्ये तेजी राहण्याचे संकेत समजले जातात. या MACD नुसार स्टॉकमधील संभाव्य तेजी आणि घसरण याचाही अंदाज लावता येतो. त्याआधारे संबंधित शेअर्समध्ये तेजी अथवा घसरण होणार याचा अंदाज लावता येतो. 


(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)