Stock Market Prediction: शेअर बाजारात सोमवारी तेजी दिसून आली. बँकिंग (Banking Stocks), ऑइल अॅण्ड गॅस (Oil and Gas) आणि एफएमसीजी (FMCG)  सेक्टरमधील शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे दोन दिवसानंतर पुन्हा एकदा शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) जवळपास एक टक्क्यांची तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 468.38 अंकांनी वधारत 61,806.19 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी  151.45 अंकांनी वधारत 18,420.45 अंकांवर स्थिरावला. 


गेल्या आठवड्यातील शेवटच्या दोन दिवसांत सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील  महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवरग्रीड, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती सुझुकी, आयटीसी, टायटन, नेस्ले, बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसली होती. तर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, टाटा मोटर्स आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसून आला.


'या' शेअर्समध्ये तेजीचे संकेत


Moving Average Convergence Divergence  (MACD) इंडिकेटरनुसार, आज शेअर बाजारात Shree Renuka Sugars, HUDCO, Dhampur Sugar आणि PB Fintech या कंपन्यांच्या शेअर दरात तेजीचे संकेत दिसून येत आहे. 


काही शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये GIC, Suzlon Energy, Kalyan Jewellers आणि Adani Enterprises या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. या कंपन्यांच्या शेअर्सने 52 आठवड्यांचा उच्चांक पार केला आहे.  


या शेअर्समध्ये घसरणीचे संकेत


MACD इंडिकेटरनुसार,  बँक ऑफ बडोदा, जम्मू-काश्मीर बँक, ट्रायडेंट, आयडीबीआय बँक आणि सिटी युनियन बँकेच्या शेअर्समध्ये घसरणीचे संकेत दिसून येत आहे. 


आज बाजारात, Nykaa, Polyplex Corp, Aurobindo Pharma आणि Aarti Industries या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसण्याची शक्यता आहे. या कंपन्यांचे शेअर दरांनी 52 आठवड्यांचा नीचांक गाठला आहे. 


MACD इंडिकेटर काय आहे?


MACD हे ट्रेंड रिव्हर्सलसाठी ओळखले जाते. MACD इंडिकेटरमध्ये सिग्नल लाइन ओलांडली की त्या शेअरमध्ये तेजी राहण्याचे संकेत समजले जातात. या MACD नुसार स्टॉकमधील संभाव्य तेजी आणि घसरण याचाही अंदाज लावता येतो.  


(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)