मुंबई : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. ट्रम्प टॅरिफ, आंतरराष्ट्रीय राजकारण, चीननं दिलेला अमेरिका दिलेला इशारा याचा परिणाम भारतीय स्टॉक मार्केटवर होतं आहे. सलग दोन आठवड्यांच्या तेजीनंतर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 2.6 टक्के घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. जागतिक स्तरावरील ट्रेड युद्धाच्या भीतीनं लोकांनी विक्रीचा मार्ग अवलंबला, अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनं इतर देशांसह स्वत: अमेरिका सरकार समोरील अजचणी देखील वाढल्या आहेत. अमेरिकेचे टॅरिफ भारतावर 9 एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्याचा देखील परिणाम भारतीय शेअर बाजारावर होईल. विदेशी गुंतवणूकदारांकडून होत समभागांच्या विक्रीचा देखील परिणाम  भारतीय शेअर बाजारावर परिणाम होतोय.  

 गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सलग दोन आठवड्याच्या तेजीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 2.6 टक्के घसरण झाली आहे.  शुक्रवारी सेनेस्केस 2050 अंकांनी घसरुन 75364.69 अकांवर बंद झाला. तिकडे निफ्टी 50 देखील 614. 8 अंकांनी घसरुन बंद झाला. यामुळं निफ्टी  50  निर्देशांक 22904. ४५ अंकावर पोहोचलेला आहे.   

अमेरिका आणि इतर देशातील व्यापार युद्धाच्या भीतीनं जागतिक बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं. अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये घसरण, भारतीय स्टॉक्स घेणारे कोण आहे  हे जाणून घेणं महत्त्वाचं असेल.  विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण असून त्यांनी शेअर्स विक्रीला सुरुवात केली आहे. आयटी आणि मेटल क्षेत्रात सर्वात मोठी आठवड्याची घसरण 9.2 टक्के इतकी झाली. ऊर्जा स्टॉक्समध्ये 7.5 टक्के तर मेटल इंडेक्स मध्ये 3.8 टक्के घसरण दिसून आली. 

टॅरिफमधून सूट आहे हे कळताच फार्मा सेक्टरमध्ये तेजी आली होती. मात्र, ट्रम्प यांनी स्वतंत्रपणे फार्मा क्षेत्रावर टॅरिफ लाजणार म्हणताच फार्मा निर्देशांक घसरला.  

येणारा आठवडा कसा असेल?

द मिंटच्या रिपोर्टनुसार, तज्ज्ञांच्या मते निफ्टी सध्या सर्वात खाली घसरली आहे. निफ्टीचा पुढचा सपोर्ट 22600 इतकी आहे. तिथून घसरुन 22100 रुपयांपर्यंत दर घसरला तर निफ्टीच्या मध्ये घसरण 22100 पर्यंत होईल.  बँक निफ्टी 50700 वर असून 52800 वर गेल्या स्थिती चांगली असेल. तज्ज्ञांच्या मते बाजार म्हणजेच निफ्टी जेव्हा 22100 अंकांवर घसरेल तेव्हा सेल ऑन राईस रणनीती राबवावी लागेल. स्टॉक्सच्या विशेष गोष्टींची माहिती असलेल्यांच्या लोकांच्या ताब्यात या गोष्टी गेल्या. स्टॉकच्या खरेदी विक्रीचा विचार करताना नेमकं किती शुल्क संबंधित ब्रोकरला किंवा  वेबसाईटला भेट देऊ शकतात.जाणकारांच्या मते शेअऱ बाजार निफ्टी निर्देशांक 22100 पर्यंत जाईल असा अंदाज आहे. बँका आणि वित्तीय सेवांमध्ये  मजबुती दिसत आहे.   

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)