Share Market Updates : अर्थसंकल्प सादर होण्याआधी शेअर बाजार वधारला असल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील शेअर बाजारदेखील वधारले असल्याचे चित्र होते. त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारातही उमटले. शेअर बाजारात प्री-ओपनिंगमध्ये चांगली सुरुवात झाली. बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर तेजी कायम असल्याचे दिसून आले. 


शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच चांगली तेजी दिसून आली. निफ्टीने 17, 500 अंकाचा टप्पा ओलांडला. निफ्टीतील 50 पैकी 46 स्टॉक्समध्ये खरेदी दिसून आली. तर, सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअर वधारले आहेत. निफ्टी बँकच्या 12 पैकी 10 शेअरमध्ये खरेदी होत असल्याचे दिसून आले. सकाळी 9.38 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 737 अंकांनी वधारून 58,757.53 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 195 अंकानी वधारला होता. निफ्टी 17,530.60 अंकांवर व्यवहार करत होता. 


आज,  शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये निफ्टी 17400 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्स प्री-ओपनिंगमध्ये सकाळी 9.01 मिनिटांनी 632.12 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टीने 135.80 अंकांनी उसळण घेतली. 


मंगळवारी शेअर बाजार बंद होताना  सेन्सेक्स 813 अंकांनी तर निफ्टी 237 अंकांनी वधारला होता. सेन्सेक्समध्ये 1.42 टक्क्यांची वाढ होऊन 58,014 वर बंद झाला होता. तर निफ्टी 1.39 टक्क्यांची वधारून 17,339 वर बंद झाला.  


अर्थसंकल्पाकडून शेअर बाजाराच्या काय अपेक्षा आहेत?


शेअर बाजाराला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) वर थोडा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय गुंतवणूकदारांचे भांडवल वाढवण्यासाठी सरकारकडून काहीसा दिलासा मिळू शकतो. शेअर बाजारात आकारण्यात येणाऱ्या भांडवली नफा करातही सरकारकडून काही प्रमाणात सवलत अपेक्षित आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: