Union Budget 2022 : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यंदाचाही अर्थसंकल्प कागदविहीन म्हणजे डिजिटल असणार आहे. कोरोना महामारीमुळं आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशातील कर प्रस्ताव आणि प्रस्तुती तसेच वित्तीय विवरण अशा सर्व प्रकारच्या कागदपत्रांची छपाई होणार नाही.
निर्मला सीतारमण यंदा किती वेळ बजटचं भाषण करणार याकडेही लक्ष लागून आहे. या आधीची दोन अर्थसंकल्पीय भाषणे त्यांनी दोन तासांपेक्षा अधिक वेळ दिली होती. 2019मध्ये आपला पहिला अर्थसंकल्प मांडताना त्यांनी 135 मिनिटे भाषण केले होते तर 2020 मध्ये त्यांनी तब्बल 162 मिनिटांचं भाषण केलं.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) एक फेब्रुवारी, 2022 रोजी अर्थमंत्री म्हणून आपला चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण मुळच्या तमिळनाडूतील मदुराई येथील असून, त्यांनी भाजपच्या प्रवक्त्या ते अर्थमंत्री होण्यापर्यंतचा मोठा पल्ला गाठला आहे. कोरोना संकटात देशातील जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यापासून ते आर्थिक सुधारणांपर्यंत निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 9 वाजता आपल्या टीमसोबत अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी रवाना होतील. वित्त मंत्रालयाच्या महासंचालकांनी दिलेल्या (मीडिया आणि कम्युनिकेशन्स) माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- जानेवारीतील GST करातून तब्बल 1.38 लाख रुपयांची कमाई; चौथ्यांदा ओलांडला 1.30 कोटींचा टप्पा
- Budget 2022: GDP म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या प्रत्येकासाठी का महत्त्वाचा आहे जीडीपी
- Budget 2022 : सशक्त भारत तयार करण्यामध्ये केंद्राचं महत्वाचं योगदान : राष्ट्रपतींकडून केंद्र सरकारचं कौतुक
- Budget 2022 : अर्थसंकल्पासाठी सरकारकडे पैसा कुठून येतो आणि कसा खर्च होतो, जाणून घ्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha