Share Market Updates : आज शेअर बाजाराची सावध सुरुवात झाली आहे. जागतिक शेअर बाजारात संमिश्र संकेत दिसत आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात फार मोठी हालचाल झाली नाही. 


आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सपाट झाली. त्यानंतर बीएसईचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये 21.86 अंकांची तेजी दिसून आली. सेन्सेक्स 55,588.27  अंकांवर खुला झाला. एनएसईच्या निफ्टीत 9.85 अंकाची तेजी दिसून आली. निफ्टी 16594 अंकांवर खुला झाला. 


शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर पाच मिनिटात शेअर बाजारात तेजी दिसून आली. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाब असल्याचे दिसून आले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 85 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीमध्ये 25 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांक 16594 अंकांवर व्यवहार करत आहे. 


एफएमसीजीमध्ये आज खरेदीचा जोर दिसत आहे. एशियन पेंट्सच्या शेअर दरात 2.13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  एनटीपीसीमध्ये 1.60 टक्क्यांनी वधारला आहे. एचयूएलमध्ये 1.26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  टाटा कंसोर्शियम 1.21 टक्क्यांनी वधारला आहे. बीपीसीएलच्या शेअर दरात 1.10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


हिंदाल्कोमध्ये 1.33 टक्क्यांची घसरण झाली आहे. ओएनजीसीच्या शेअर दरात 0.8 टक्क्यांनी घट झाली आहे. एसबीआय लाइफमध्येबी 0.54 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 


दरम्यान, मंगळवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 359 अंकांनी तर, निफ्टीही 76 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये 0.64 टक्क्यांची घसरण होऊन तो 55,566 वर बंद झाला. तर, निफ्टीमध्ये 0.46 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,584 अंकावर बंद झाला. मंगळवारी 1720 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 1548 शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. 121 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या: