Share Market Opening : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचे सावट शेअर बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजाराची सुरुवात किंचीत घसरणीसह झाली. सेन्सेक्समध्ये 28.25 अंकांची घसरण झाली. तर, निफ्टीत 7.25 अंकांची घसरण झाली. त्यनंतर बाजारातील घसरण वाढत गेली. 


सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 218 अंकांची आणि निफ्टीमध्ये 66 अंकांची घसरण झाली. 


जागातिक शेअर बाजारात सकारात्मक संकेत दिसून येत आहे. आशियाई बाजारातही तेजीचे वातावरण आहे. निक्कई आणि कोस्पी हे शेअर निर्देशांकही वधारले आहेत. त्याशिवाय अमेरिकन शेअर बाजारातील निर्देशांक डाऊ जोन्स 260 अंकांनी वधारला. तर, नॅस्डॅकमध्येही 113 अंकांची तेजी दिसून येत आहे.


सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 14 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. सर्वाधिक घसरण नेस्लेच्या शेअरमध्ये झाली. त्याशिवाय, एचयूएल, सन फार्मा, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, मारूती, आयटीसी, इन्फोसिस, रिलायन्स, अल्ट्रा केमिकल, एचसीएल टेक, एचडीएफसीच्या शेअर दरात विक्रीमुळे घसरण सुरू आहे. 


तर, टाटा स्टीलच्या शेअर दरात उसळण दिसून येत आहे. तर, अॅक्सिस बँक, एनटीपीस, एसबीआय, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व, टेक महिंद्रा, विप्रो, कोटक बँक आदींमध्ये खरेदी सुरू असल्याने शेअर दर वधारले आहेत. 


दरम्यान, सेन्सेक्समध्ये मंगळवारी 1.02 टक्क्यांची घसरण होऊन तो 55.107 अंकावर बंद झाला. तर निफ्टीही 0.92 टक्के अंकांनी घसरून तो 16,416 अंकांवर बंद झाला. शेअर बाजार बंद होताना 1261 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 1954 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. तर 126 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. मंगळवारी शेअर बाजार बंद होताना रिअॅलिटी, आयटी आणि कॅपिटल गूड्समध्ये एक टक्क्यांची घसरण झाली. ऑईल अॅण्ड गॅस तसेच ऊर्जा क्षेत्रातल्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याने त्याच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Share Market FPI : शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकदारांचा विक्रीचा सपाटा; मे महिन्यातही 'इतकी' गुंतवणूक काढली