Share Market Opening on 4 May: जगभरातील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर बुधवारीही देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय शेअर मार्केटसह जागतिक शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळत आहे. आज बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) या दोन्ही प्रमुख देशांतर्गत इंडेक्सची सुरुवात घसरणीसह झाल्याचं पाहायला मिळालं.
प्री-ओपनमध्ये संमिश्र कल
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू होण्यापूर्वीच देशांतर्गत शेअर बाजारांवर दबाव दिसून आला. सिंगापूरमध्ये NSE निफ्टी फ्युचर्स SGX निफ्टी सकाळी घसरणीसह व्यवहार करत होता. यामुळे आज देशांतर्गत बाजाराची सुरुवात फारशी चांगली होणार नाही, याचे संकेत बाजार सुरू होण्यापूर्वीच मिळाले होते. प्री-ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये संमिश्र कल दिसून आला. सत्र सुरू होण्यापूर्वी सेन्सेक्स सुमारे 60 अंकांनी वर होता, तर निफ्टी सुमारे 10 अंकांनी घसरला होता.
बाजार उघडताच पडझड
भारतीय शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये पडझड झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळी 09:15 वाजता बाजारात व्यवहार सुरू झाला तेव्हा बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स सुमारे 15 अंकांच्या घसरणीसह 61,180 अंकांवर आला. निफ्टीही 10 अंकांनी घसरला आणि 18,100 अंकांच्या खाली राहिला.
जागतिक बाजारातही घसरण
बुधवारीही अमेरिकन बाजारातील मोठ्या घसरणीची प्रक्रिया सुरूच होती. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज 0.80 टक्के आणि S&P 500 0.70 टक्क्यांनी घसरले, तर टेक-केंद्रित Nasdaq कंपोझिट इंडेक्स 0.46 टक्क्यांनी खाली आला. आजच्या शेअर बाजारातील व्यवहारात आशियाई बाजारांमध्ये तेजी आहे. जपानचा निक्केई 0.12 टक्के आणि हाँगकाँगचा हँगसेंग 1.14 टक्क्यांसह व्यवहार करत आहे.