Share Market Opening 24 March : आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात (Stock Market) संथ सुरुवात पाहायला मिळत आहे. संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी दबावाखाली आहेत. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व्यवहारात संथ व्यवहार पाहायला मिळत आहे.
सेन्सेक्स-निफ्टीची संथ सुरुवात
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 100 अंकांनी वाढीसह सुरु झाला. मात्र, त्यानंतर विक्री सुरू झाली आणि सेन्सेक्स गडगडला. सध्या सेन्सेक्स 48.56 अंकांनी घसरून 57,876.72 अंकांवर पोहोचला आहे. निफ्टी 25.75 अंकांनी घसरून 17,051.15 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात आयटी शेअर्स मजबूतीसह व्यवहार करताना दिसत आहेत. Accenture मधील 19000 नोकरकपातीच्या बातमीनंतर ही तेजी आली असल्याचं मानलं जात आहे. सुरुवातीच्या व्यवहारात, डॉलरच्या तुलनेत रुपया 4 पैशांनी घसरून 82.24 रुपयांवर बंद झाला.
जागतिक बाजाराचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर
सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समधील 30 पैकी 12 शेअर्स तेजीसह व्यवहार करताना दिसत आहेत. दुसरीकडे, आशियाई बाजारात जपानचा निक्केई आणि कोरियाचा कोस्पी निर्देसांक जवळपास अर्धा टक्का घसरणीसह व्यवहार करत आहेत. विक्रीमुळे अमेरिकन बाजारातही कमजोरी दिसून येत आहे. या जागतिक बाजाराचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही होताना दिसत आहे.
प्री-ओपनिंगमधील परिस्थिती कशी होती?
आजचा व्यवहार सुरू होण्यापूर्वीच देशांतर्गत शेअर बाजारांवर दबाव होता. सिंगापूरमध्ये, NSE निफ्टीचा फ्युचर्स SGX निफ्टी सकाळी सुमारे 28 अंकांनी किंवा 0.17 टक्क्यांनी घसरला होता. देशांतर्गत शेअर बाजाराची आजची सुरुवात खराब झाल्याचे हे संकेत होते. त्याचवेळी बाजारातील गोंधळाचे वारेमाप असलेल्या इंडिया विक्सचे भाव दोन टक्क्यांनी घसरले होते. प्रो-ओपन सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही तोट्यात होते. सत्र सुरू होण्यापूर्वी सेन्सेक्स सुमारे 35 अंकांनी घसरला होता, तर निफ्टी जवळपास स्थिर होता.
आज तेजीत असलेले शेअर्स
आज बाजारात इन्फोसिस, टीसीएस (TCS), विप्रो, आयटीसी (ITC), इंडसइंड बँक, कोटक बँक, कोटक बँक, पावरग्रीड, एचसीएल टेक, एल अँड टी हे शेअर्स तेजीत आहेत.
'या' शेअर्समध्ये घसरण
आज हिंदुस्थान युनिलिव्हर, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा महिंद्रा अँड महिंद्रा, मोटर्स, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, सनफार्मा, नेस्ले, टायन, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अदानी समुहानंतर Hindenberg चा नवा रिपोर्ट, 'या' कंपनीला केले शॉर्ट, शेअर्समध्ये 18 टक्के घसरण