Hindenberg Research Report : हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहानंतर जॅक डोर्सी यांच्या Block Inc च्या शेअर्सला शॉर्ट केलेय. हिंडनबर्ग रिसर्च फर्मने रिपोर्टमध्ये म्हटले की, 'जॅक डोर्सी यांच्या नेतृत्वातील पेमेंट कंपनी Block Inc च्या शेअर्सला शॉर्ट केलेय. Block Inc कंपनीने युजर्सची संख्या वाढवून दाखवली तर कस्टमर झाल्यानंतर खर्च कमी दाखवला आहे.' हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर प्री मार्केट ट्रेंडमध्ये Block Inc च्या शेअर्समध्ये 18 टक्के घसरण दिसून आली. जॅक डोर्सी हे ट्वीटरचे सह संस्थापक आणि सीईओ राहिलेत. 


हिंडनबर्ग रिसर्चने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, मागील दोन वर्षांपासून Block Inc कंपनीचा आणि शेअर्सचा आम्ही अभ्यास करत आहोत. यामध्ये असे दिसले की, ' Block Inc ने पद्धतशीरपणे लोकसंख्या शास्त्राचा फायदा घेतला आहे.' Block Inc च्या व्यवसायामागील जादू हे डिरप्टिव इनोवेशन नाही, तर  ग्राहक आणि सरकारची फसवणूक करण्याचा हेतू आहे. त्यासोबतच रेग्युलेशनपासून वाचण्यासाठी, प्रीडेटरी लोनचे ड्रेसअप, रिव्होल्युशनरी टेक्नोलॉजी, आपल्या गुंतवणूकदारांना गोंधळात टाकले आणि मेट्रिक्सला फुगवून दाखवले, असे रिपोर्ट्समध्ये म्हटलेय.
 
या फेराफेरीमध्ये सामील असणारे माजी कर्मचारी, पार्टनर आणि उद्योग जगतातील तज्ज्ञांशी याबाबत बोलणं झाल्याचे हिंडनबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलेय. त्याशिवाय  रेग्युलेटरी आणि इतर बाबीची पडताळणी केली. तसेच FOIA आणि इतर सार्वजनिक रेकॉर्ड तपासले आहेत. हिंडनबर्गने आपल्या रिपोर्ट्समध्ये म्हटले की, जॅक डोर्सीने पाच बिलियन डॉलरचे साम्राज्य उभारले आहेत. त्यासोबतच कंपनीने असा आरोप केलाय की, डोर्सी आणि कंपनीच्या टॉप एक्जीक्यूटिव्हने एक अब्ज शेअर्स विकले आहेत. 






अदानी समूहावर गंभीर आरोप -


दरम्यान, याआधी हिंडनबर्ग रिसर्च फर्मने भारतातील अदानी समूहाच्या शेअर्सला शॉर्ट केले होते. या अहवालात अदानी समूहातील कंपन्यांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच स्टॉक फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा हवाला देत अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अदानी समूहाच्या बाँड आणि शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.अहवालानंतर अदानींची संपत्ती 15 अदानी यांच्या मोठ्या संपत्तीत घट झाली असून सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतून त्यांना टॉप-10 मधील स्थान गमवावे लागले होते. गौतम अदानी समूहाविषयी केलेल्या खुलाशानंतर आता हिंडनबर्ग रिसर्चने जॅक डोर्सी यांच्या Block Inc बद्दल खुलासा केला आहे. 


हिंडेनबर्गचे संस्थापक कोण आहेत?


हिंडेनबर्गने 2017 पासून किमान 16 कंपन्यांमध्ये संभाव्य गैरकृत्यांचा भांडाफोड केला आहे. ट्विटर डीलवरूनही हिंडेनबर्ग रिसर्चने भाष्य केले होते. नॅथन अँडरसन हिंडनबर्ग रिसर्च संस्थापक आहेत. अँडरसन यांनी कनेक्टिकट विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यवसायात पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी डेटा कंपनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंक येथे वित्त क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली, जिथे त्यांनी गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांमध्ये काम केले.