Share Market Opening : भारतीय शेअर बाजारात आज खरेदीचे संकेत दिसून येत आहेत .  सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारला आहे. आयटी, बँकिंग शेअरच्या दरात वाढ झाल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसून येत आहे. 

आज बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 53,170.70  अंकांवर सुरू झाला. तर, एनएसई निर्देशांक निफ्टी 15,818.20   अंकावर सुरू झाला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 53400 अंकांचा टप्पा पार केला. तर, निफ्टी 15900 च्या पातळीजवळ आहे. 

आज शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 283.74 अंकांनी वधारला. तर निफ्टी 59.30 अंकांनी वधारला. सकाळी 10.05 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 235 अंकांनी वधारत 53,369.73 अंकावर होता. तर, निफ्टी निर्देशांक 55.60 अंकांनी वधारत 15,866.45 अंकावर वधारला होता. 

आज निफ्टी 50 पैकी 40 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 10 शेअरमध्ये विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आले. बँक निफ्टीमध्ये 301 अंकांची वाढ झाली असून 34,116.90 अंकांवर व्यवहार करत आहे. 

निफ्टीत एशियन पेंट्सच्या शेअर दरात 2.83 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  तर, आयशर मोटीसच्या दरात 2.73 टक्क्यांनी वाढ झाली.य बजाज फायनान्सचा शेअर दर 2.45 टक्क्यांनी वधारला आहे. हीरो मोटोकॉर्प 1.57 टक्के आणि बीपीसीएलच्या शेअर दरात 1.56 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

तर, ओएनजीसीच्या शेअर दरात 4.63 टक्क्यांनी घसरण झाली आहे. हिदाल्कोमध्ये 4.17 टक्के, टाटा स्टीलमध्ये 1.95 टक्के आणि कोल इंडियामध्ये 1.86 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनटीपीसीच्या शेअर दरात 1.14 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात निर्देशांक वधारत झाली होती. मात्र, दिवसाअंती बाजारात पडझड पाहायला मिळाली. दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 100.42 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 53,134.35 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय निफ्टी निर्देशांक 24.50 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या किंचित घसरणीनंतर 15,810.85 च्या पातळीवर बंद झाला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: