Share Market Updates : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारातील व्यवहाराची चांगली सुरुवात झाली. आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक खरेदीचा जोर असल्याने वधारले आहे. जागतिक शेअर बाजारातही खरेदीचा जोर दिसत आहेत. आशियाई, युरोपीयन आणि अमेरिकन शेअर बाजार वधारले आहेत. सेन्सेक्स 398.94  अंकांनी वधारला. त्याशिवाय, सेन्सेक्समध्ये 54,159.72  च्या पातळीवर व्यवहार करत आहे. . त्याशिवाय, निफ्टी इंडेक्स 126  अंकांनी वधारत तेजीसह 16,175 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.


आज सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 384 अंकांनी वधारून 54,145.59 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टीत 122 अंकांची तेजी असून 16,172.05 अंकांवर निर्देशांक व्यवहार करत आहे. 


 जागतिक शेअर बाजारात  निक्केई, शांघाय, कोस्पी निर्देशांक वधारला आहे. त्याशिवाय, अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक डाऊ जोन्स 658 अंकांनी वधारला आहे. त्याशिवाय, नॅस्डॅकमध्येदेखील 200  अंकांची तेजी दिसत आहे. 


आज सर्वच सेक्टरमध्ये खरेदी सुरू असल्याचे दिसत आहे. निफ्टी, बँक, वित्तीय सेवा, एफएमजीसी, आयटी, मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, खासगी बँक, रियल्टी, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी दिसत आहे. 


सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्सच्या दरात तेजी दिसून येत आहे. तर, तीन शेअरमध्ये घसरण सुरू आहे. इन्फोसिसच्या शेअरमध्ये आज दोन टक्क्यांहून अधिक तेजी दिसून येत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: