Share Market Opening Bell:  शेअर बाजारातील व्यवहार आज तेजीसह सुरू झाले. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारले. तर, बँक निफ्टी (Bank Nifty) निर्देशांकाने आतापर्यंतचा उच्चांक (Bank Nifty All Time High) गाठला असून 42000 अंकांनजिक खुला झाला. बाजार सुरू झाल्यानंतर मात्र विक्रीचा दबाब दिसून आल्याने निर्देशांकात काही प्रमाणात घसरण झाली. 


बँक निफ्टीने ऑलटाइम उच्चांक गाठला. बँक निफ्टी 0.35 टक्क्यांनी वधारत 41832 अंकांच्या पातळीवर खुला झाला.  


आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 119.4 अंकांनी वधारत  61,304.29 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 85.45 अंकांच्या तेजीसह 18,288 अंकांवर खुला झाला. त्यानंतर नफावसुलीचे संकेत दिसू लागले. सकाळी 10.25 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 3 अंकांच्या घसरणीसह 61,181.70 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 7.40 अंकांनी वधारत 18,210.20 अंकांवर व्यवहार करत होता. 


आज, सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक, एचसीएल टेक, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, कोटक महिंद्रा बँक, एल अॅण्ड टी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, विप्रो, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्समध्ये खरेदीचा जोर दिसून येत आहे. 


प्री-ओपनिंगमध्ये कसा प्रतिसाद?


प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली. सेन्सेक्स 2.74 अंकांनी वधारत 61187 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 31.65 अंकांनी वधारत 18234 अंकांवर व्यवहार करत होता. 


आज बाजार कसा असेल?


शेअर इंडियाचे उपाध्यक्ष, संशोधन प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी सांगितले की, आज बाजार 18200-18600 या दरम्यान व्यवहार करण्याची शक्यता आहे. बाजारात तेजीचा अंदाज त्यांनी वर्तवला. आज, पीएसयू बँक, मेटल, ऑटो, रियल्टी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे. तर, आयटी, फार्मा, मीडिया, एफएमसीजी आणि इन्फ्रामध्ये विक्री दिसून येऊ शकते. 


आज दिवसभरातील व्यवहारात बँक निफ्टी 41500-42000 या पातळी दरम्यान व्यवहार करू शकतो. बँक निफ्टीत तेजी दिसून येऊ शकते, असा अंदाज त्यांनी वर्तवला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: