Stock Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज घसरणीसह झाली. बाजारात विक्रीचा सपाटा दिसून येत आहे. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा किंचीत तेजी दिसून आली. मात्र, त्यानंतर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीत आज मोठी पडझड झाली. आयटी, पॉवर, एनर्जी आणि ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसत आहे.
आज बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 207.15 अंकांच्या घसरणीसह 61,456.33 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 61.25 अंकांच्या घसरणीसह 18,246.40 अंकांवर खुला झाला. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 460 अंकांच्या घसरणीसह 61,202.94 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 134.20 अंकांच्या घसरणीसह 18,173.45 अंकांवर व्यवहार करत होता.
शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळेत सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 5 शेअर दरात तेजी दिसून आली होती. तर, 25 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी फक्त 13 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसत असून 37 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
सेन्सेक्स निर्देशांकातील भारती एअरटेल, मारुती, अॅक्सिस बँक, टाटा स्टील, हिंदुस्तान लिव्हर, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, एनटीपीसी, पॉवरग्रीड, टायटन, एल अॅण्ड टी, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, व्रिपो आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
तर, निफ्टी निर्देशांकात भारती एअरटेल, भारत पेट्रोलियम, अॅक्सिस बँक, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. एसबीआय लाइफ, डॉ. रेड्डी लॅबज, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टेक महिंद्रा कंपनीच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
शुक्रवारी बाजारात घसरण
शुक्रवारी, बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 87 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 36 अंकांची घसरण झाली होती. सेन्सेक्स 61,663 अंकावर तर, निफ्टी 18,307 अंकांवर बंद झाला होता. बँक निफ्टीतही किंचीत घसरण नोंदवण्यात आली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: