Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजच्या व्यवहाराची सावध सुरुवात झाली आहे. शेअर बाजारात (Share Market) सुरुवातीला किंचित तेजी दिसून आली. त्यानंतर विक्रीच्या दबावाने बाजारात घसरण सुरू झाली. एसजीएक्स निफ्टी (SGX Nigfty) मध्ये घसरण दिसत होती.
आज बाजाराची सुरुवात जवळपास सपाट झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 13.14 अंकांनी वधारत 58,004 अंकांवर वधारला. तर, निफ्टी (Nifty) 15 अंकांनी वधारत 17,256 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.32 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 133 अंकांच्या घसरणीसह 57,824.39 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 39 अंकांच्या घसरणीसह 17,200.05 अंकावर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 14 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसत असून 16 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसत आहे. त्याशिवाय, निफ्टीतील 50 मधील 17 शेअर्समध्ये तेजी दिसत असून 33 शेअरमध्ये घसरण दिसत आहे.
सेन्सेक्समधील विप्रो, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयटीसीच्या शेअर दरात तेजी दिसून आली. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हमध्ये ही तेजी दिसून येत आहे.
अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, टाटा स्टील, नेस्ले, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, एसबीआय, भारती एअरटेल, कोटक बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि रिलायन्सच्या शेअर दरात घसरण झाली.
प्री-ओपनिंगमध्ये बाजार
शेअर बाजारात आज प्री-ओपनिंग सत्रात निफ्टीत तेजी दिसून आली होती. तर, सेन्सेक्समध्ये घसरण दिसली. सेन्सेक्स 46 अंकांनी घसरला होता.
सोमवारी बाजारात घसरण
सोमवारी, सेन्सेक्समध्ये 200 अंकांची आणि निफ्टीत 73 अंकांची घसरण झाली होती. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 57,991.11 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी 0.43 टक्क्यांच्या घसरणीसह 17,241 अंकांवर पोहचला. बँक निफ्टीत 84 अंकांची घसरण दिसून आली होती. बाजार खुला होताच सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला होता. पण बाजार बंद होताना तो काहीसा सावरून घसरण 200 अंकांपर्यंत आली. शेअर बाजार बंद होताना 1406 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 2056 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 161 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या: