Share Market Opening Bell:  शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत आहेत. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्सने (Sensex) 61 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 67.99 अंकांच्या तेजीसह 61,405.80 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 19.10 अंकांच्या तेजीसह 18,288.10 अंकांवर खुला झाला. 


शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत आहेत. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर नफावसुलीने काही प्रमाणात निर्देशांकात घसरण दिसली. मात्र, त्यानंतर बाजार सावरला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 93 अंकांच्या तेजीसह 61,431.69 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 23.35 अंकांच्या तेजीसह 18,292.35 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 50 मधील 35 कंपन्यांचे शेअर तेजीत दिसून आले. तर, 15 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 


सेन्सेक्स निर्देशांकात समावेश असणाऱ्या 30 पैकी 21 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. यामध्ये भारती एअरटेल, पॉवरग्रीड, आयटीसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचडीएफसी, अल्ट्राटेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 


तर, निफ्टी निर्देशांकातील पॉवरग्रीडच्या शेअर दरात 2.16 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, आयटीसीच्या शेअर दरात 1.87 टक्के, नेस्लेच्या शेअर दरात 1.58 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. बजाज ऑटोच्या शेअर दरात 1.14 टक्क्यांची दिसत आहेत. तर, इन्फोसिसच्या शेअर दरात 1.16 टक्क्यांची घसरण दिसत आहे. सनफार्मामध्ये 1.01 टक्के, ओएनजीसीच्या शेअर दरात 0.99 टक्के, टाटा मोटर्सच्या शेअर दरात 0.85 टक्के, बीपीसीएलच्या शेअर दरात 0.85 टक्क्यांची घसरण दिसत आहे. 


बँक निफ्टीत तेजी 


बँक निफ्टी निर्देशांकात आज तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टी आज 43,346.35 अंकांवर खुला झाला. तर, सकाळच्या सत्रात 43,363.80 अंकाचा उच्चांक गाठला. बँक निफ्टीतील 12 पैकी 8 बँकेच्या शेअर्सच्या मध्ये तेजी दिसून येत आहे. तर, चार बँकांचे शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये 0.74 टक्क्यांची तेजी दिसत आहे. तर, कोटक बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात तेजी दिसत आहे. 


तर, पीएनबी, बंधन बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँकेच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.