Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही खरेदीचा जोर दिसून येत आहे. बँक निफ्टीत (Bank Nifty) तेजी दिसून येत असल्याने बाजार वधारला आहे. बाजारात आज गॅप अपने सुरुवात झाली आहे. बाजार सुरू होताच आज निफ्टीने 18 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. सोमवारीदेखील बाजारात तेजी दिसून आली होती.
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 318.99 अंकांनी वधारत 61,065.58 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 118.50 अंकांनी वधारत 18,130.70 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 338 अंकांनी वधारत 61,084.63 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 108 अंकांनी वधारत 18,120.45 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्समधील 30 पैकी 35 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा जोर आहे. तर, निफ्टीतील 50 पैकी 44 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत आहे. तर, सहा कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसत आहे.
सेक्टोरियल इंडेक्समध्ये मेटल सेक्टर वगळता इतर सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे. सर्वाधिक तेजी हेल्थकेअर इंडेक्समध्ये दिसत असून 1.37 टक्क्यांनी वधारला आहे. तर, फार्मा सेक्टरमध्ये 1.21 टक्क्यांची तेजी दिसत आहे. आयटी सेक्टर 0.85 टक्क्यांनी वधारला आहे. बँक निफ्टीमध्ये 0.35 टक्क्यांची तेजी दिसत असून 41449 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
आज प्री-ओपनिंग सत्रात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 429 अंकांनी वधारत 61175.84 च्या पातळीवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 192 अंकांच्या तेजीसह 18204 अंकांवर व्यवहार करत होता.
सोमवारी बाजारात तेजी
सोमवारी, बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 786 अंकांनी वधारला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 225 अंकांनी वधारला होता. सेन्सेक्स निर्देशांकामध्ये 1.31 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,746 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.27 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,012 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही 317 अंकांची वाढ होऊन तो 41,307 अंकांवर स्थिरावला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: