Central Silk Board Jobs 2022 : सेंट्रल सिल्क बोर्ड बंगळुरुनं अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संस्थेत वैज्ञानिक बी या पदांसाठी भरती केली जाणार आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट csb.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत असणार आहे.  


रिक्त जागांचा तपशील 


वैज्ञानिक बी च्या 66 पदांची भरती करण्यासाठी ही भरती मोहीम राबवण्यात येत आहे. 


शैक्षणिक पात्रता


कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून संबंधित स्पेशलायझेशनमध्ये एमएससी उत्तीर्ण झालेले उमेदवार/कृषी विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष अभ्यासक्रम या पदांसाठी अर्ज करू शकतात. संबंधित कामाचा अनुभव असावा.


वयोमर्यादा 


या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावं. 


वेतनश्रेणी 


भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल.


अर्ज शुल्क 


भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागेल. भरतीसाठी, जनरल/EWS/OBC/माजी सैनिक उमेदवारांना अर्जादरम्यान 1000 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर SC/ST/PWD/महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.


कशी होणार निवड? 


ICMR (PhD) JRF/SRF-2022 मध्ये मिळालेल्या रँकच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. 


अर्ज कसा कराल? 


भारतीय क्रीडा प्राधिकरण यंग प्रोफेशनल पदासाठी भरती करणार आहे. अधिकृत वेबसाईट sportsauthorityofindia.gov.in वर जाऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. जे 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत चालेल. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की, त्यांची निवड कंत्राटी पद्धतीनं केली जाईल.



अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


NTPC मध्ये बंपर भरती, प्रतिमाह 1 लाखांहून अधिक वेतन मिळवण्याची संधी