Share Market News: शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज तेजीने झाली. आज एलआयसीची लिस्टिंग होणार असून दुसरीकडे भारती एअरटेलचे तिमाही निकाल जाहीर होणार आहे. एअरटेलमुळे आज टेलिकॉम क्षेत्रात उसळण दिसून येत आहे. 
ऑटो आणि बँकिंग शेअरदेखील वधारले आहेत. 


आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 311.35 अंकावर उघडला.  तर, एनएसई निर्देशांक निफ्टी 70.30 अंकानी वधारत 15,912 अंकावर उघडला. जागतिक शेअर बाजारात संमिश्र चित्र दिसून आले. SGX NIfty मध्ये तेजी दिसून आली. स


निफ्टीमधील 39 स्टॉकचे शेअर दर वधारले असून 11 स्टॉकचे दर घसरले आहेत. बँक निफ्टीत 314 अंक म्हणजे जवळपास एक टक्क्यांची तेजी दिसत आहे. 


हिंदाल्कोच्या शेअर दरात 4.5 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, ओएनजीसीचा शेअर दर 2.90 टक्क्यांनी वधारला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये 1.80 टक्क्यांनी शेअर वधारला आहे.  टाटा स्टीलमध्ये 2.60 टक्के आणि जेएसडब्लू स्टीलमध्ये 2.03 टक्क्यांनी दर वधारला असल्याचे दिसून आले आहे. 


आज सिप्लाच्या शेअर दरात 0.9 टक्के, सन फार्मामध्ये 0.40 टक्क्यांची घसरण झाली आहे. टाटा कंसर्शियममध्ये 0.37 टक्के आणि इन्फोसिसमध्ये 0.37 टक्क्यांनी घसरण झाली आहे. टेक महिंद्राचाही दर 0.37 टक्क्यांनी घसरला आहे. 


दरम्यान, सोमवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 180 अंकानी, तर निफ्टी 60 अंकानी वधारला होता. सेन्सेक्समध्ये 0.34 टक्क्यांची वाढ होऊन तो 52,973 वर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 0.38 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,842 वर बंद झाला. 


सोमवारी,  2180 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. तर 1138 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 172 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.