Share Market Opening Bell: आठवड्यातील सुरुवातीचे दोन तेजी दिसून आलेल्या भारतीय शेअर बाजारातील (Indian Share Market) व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक शेअर बाजारातील घसरणीचे परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आले. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. तर, आशियाई शेअर बाजारातही विक्रीचा दबाव दिसत आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 282 अंकांच्या घसरणीसह 60,628 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 77 अंकांच्या घसरणीसह 18,045 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 238 अंकांच्या घसरणीसह 60,672.07 अंकांवर व्यवहार करत आहेत. तर, निफ्टी निर्देशांक 72 अंकांच्या घसरणीसह 18,050.00 अंकांवर व्यवहार करत आहे.
शेअर बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टी, आयटी, ऑटो, एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा आदी सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 6 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, 44 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त दोन कंपन्यांचे शेअर दर तेजीत असून 28 कंपन्यांचे शेअर दर घसरले आहेत.
या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी
डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअर दरात 1.63 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, डिव्हीज लॅबच्या शेअर दरात 1.03 टक्के, सिप्लाच्या शेअर दरात 0.76 टक्के, ओएनजीसीच्या शेअर दरात 0.76 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय सन फार्मा 0.67 टक्के, भारती एअरटेल 0.37 टक्के, यूपीएल 0.30 टक्के, अपोलो हॉस्पिटलच्या शेअर दरात 0.18 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.
या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण
टाटा स्टीलच्या शेअर दरात 1.18 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. बजाज फायनान्सच्या शेअर दरात 0.97 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.90 टक्के, एचयूएल 0.80 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. कोटक महिंद्राच्या शेअर दरात 0.75 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
बुधवारी बाजारात अस्थिरता
बुधवारी, शेअर बाजारात व्यवहारात अस्थिरता दिसून आली. बीएसईचा 30 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स निर्देशांक 17.15 अंकांनी घसरून 60,910.28 अंकांवर बंद झाला. बुधवारी व्यवहाराच्या दिवशी एका वेळी सेन्सेक्समध्ये 213.66 अंकांपर्यंतची घसरण झाली होती.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 9.80 अंकांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांनी घसरून 18,122.50 अंकांवर स्थिरावला.