Share Market Holiday on Ram Navami 2023 : जर तुम्ही शेअर बाजारात (Share Market) पैसे गुंतवलेत तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. रामनवमी निमित्त आज देशभरात रामनवमीचा (Ram Navami 2023) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE-Bombay Stock Exchange), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE-National Stock Exchange) कमोडिटी मार्केट आणि करन्सी मार्केट यावेळी बंद राहणार आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) म्हणजेच एमसीएक्स संध्याकाळी 5 नंतर उघडेल. यानंतर संध्याकाळच्या सत्रात सोन्याचे (Gold) व्यवहार होतील.
Share Market Holiday : पुढील आठवड्यातही शेअर बाजाराला भरपूर सुट्ट्या
आज म्हणजेच 30 मार्च 2023 रोजी रामनवमीच्या (Ram Navami 2023) सुट्टीमुळे शेअर बाजारातील व्यवहार बंद (Share Market Updates) आहेत. या व्यतिरिक्त एप्रिल महिन्यामध्ये विविध सणानिमित्त तीन दिवस मार्केट बंद राहिल. पुढील आठवड्यातही दोन दिवस शेअर बाजार कोणत्याही ट्रेडिंग शिवाय बंद असेल. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये (BSE) 4 एप्रिल म्हणजेच मंगळवारी आणि 7 एप्रिल म्हणजेच शुक्रवारी सणानिमित्त सुट्टी असून बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. 4 एप्रिलला महावीर जयंती आणि 7 एप्रिलला गुड फ्रायडे असल्याने शेअर बाजारात कोणतीही ट्रेडिंग होणार नाही. तसेच 14 एप्रिल रोजी डॉ. भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.
बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद
काल भारतीय शेअर बाजारासाठीचा (Stock Market) दिवस चांगला ठरला. बुधवारी, बाजार तेजीसह बंद झाला. बँकिंग, आयटी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे बाजार बुधवारी वधारल्याचं पाहायला मिळालं. काल शेअर बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 346 अंकांच्या तेजीसह 57,960 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 129 अंकांच्या तेजीसह 17,080 अंकांवर बंद झाला.
2023 वर्षात शेअर बाजार किती दिवस बंद राहील?
- 4 एप्रिल 2023 : महावीर जयंतीनिमित्त सुट्टी
- 7 एप्रिल 2023 : गुड फ्रायडेनिमित्त सुट्टी
- 14 एप्रिल 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी
- 1 मे 2023 : महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी
- 28 जून 2023 : बकरी ईदनिमित्त सुट्टी
- 15 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टी
- 19 सप्टेंबर 2023 : गणेश चतुर्थीमुळे सुट्टी
- 2 ऑक्टोबर 2023 : गांधी जयंतीनिमित्त सुट्टी
- 24 ऑक्टोबर 2023 : दसऱ्यानिमित्त सुट्टी
- 14 नोव्हेंबर 2023 : दिवाळीनिमित्त सुट्टी
- 27 नोव्हेंबर 2023 : गुरुनानक जयंतीनिमित्त सुट्टी
- 25 डिसेंबर 2023 : ख्रिसमसनिमित्त सुट्टी
महत्त्वाच्या इतर बातम्या :